Chandrayaan 3 : चंद्रावर भारत पोहचला, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातही जल्लोष 

130
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे. १४ जुलै रोजी चंद्रयान चंद्राकडे झेपावले आहे, २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटावर हे यान चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. अखेरचे १५ मिनिटांचे थेट प्रक्षेपण देशभर सुरु होते, ज्या क्षणी हे यान चंद्रावर उतरले, तेव्हा देशभरातून नागरिकांनी जल्लोष केला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातही तरुणांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त केला.
chandrayan
आज भारत ऐतिहासिक क्षण अनुभवणार आहे, भारताचे शास्त्रज्ञ इतिहास रुचणार आहेत, त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, तसे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सर्व क्रीडा उपक्रमातील खेळाडू आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी तिथे उपस्थित होते. या सर्व तरुणांनी जल्लोष व्यक्त केला. स्मारकातील मोठ्या टीव्हीवर थेट प्रक्षेपण सुरु होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.