Cloudburst in Himachal Pradesh And Uttarakahnd: कुल्लू आणि मंडीमध्ये ढगफुटीमुळे हाहाःकार, ३० जण बेपत्ता! पाहा व्हिडीओ

175
Cloudburst in Himachal Pradesh And Uttarakahnd: कुल्लू आणि मंडीमध्ये ढगफुटीमुळे हाहाःकार, ३० जण बेपत्ता! पाहा व्हिडीओ
Cloudburst in Himachal Pradesh And Uttarakahnd: कुल्लू आणि मंडीमध्ये ढगफुटीमुळे हाहाःकार, ३० जण बेपत्ता! पाहा व्हिडीओ

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) ढगफुटी झाल्यानं हाहाःकार (Cloudburst in Himachal Pradesh And Uttarakahnd) माजला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबद्दल माहिती दिली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत 30 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्टजवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती मिळत आहे.

परिसरातील शाळाही पुरात वाहून गेल्या
हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात सुमारे 30 लोक बेपत्ता झाले आहेत. तर, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी गढवालमध्येही ढगफुटीची घटना घडली आहे. कुल्लूच्या रामपूर भागातील समेज येथील पॉवर प्लांट प्रकल्पातील अनेक लोक ढग फुटीनंतर बेपत्ता आहेत. 20 हून अधिक घरं जमीनदोस्त झाली असून अनेक वाहनं वाहून गेली आहेत, परिसरातील शाळाही पुरात वाहून गेल्या आहेत. मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर एक मृतदेह सापडला आहे, तर अनेकजण बेपत्ता आहेत. मंडी जिल्हा प्रशासनानं हवाई दलाला बचावासाठी सतर्क केलं आहे. घटनास्थळी उपस्थित स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतलं आहे. (Cloudburst in Himachal Pradesh And Uttarakahnd)

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
डीसी अनुपम कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या भागातून 19 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी रस्ते बंद झाल्यामुळे बचाव पथक उपकरणांसह दोन किलोमीटर चालत घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकारी आणि बचाव पथकातील सदस्यांना ढगफुटीमुळे बाधित झालेल्या लोकांना सर्वतोपरी मदत करण्यास सांगण्यात आलं आहे. (Cloudburst in Himachal Pradesh And Uttarakahnd)

शिमलातील परिस्थिती चिंताजनक
शिमला रायपूरच्या झाकरीमध्ये बुधवारी रात्री पावसामुळे घानवी आणि समेळ खड्ड्यामध्ये ढगफुटीमुळे पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. घणवी येथे ढगफुटीमुळे आलेल्या पुराची तपासणी केली असता ढगफुटीमुळे 5 घरं, 2 फूट पूल, शाळा इमारत, रुग्णालय, वीज प्रकल्पाचे विश्रामगृह, एक जेसीबी मशीन आणि तीन छोटी वाहनं वाहून गेली आहेत. ढगफुटी झाल्यानंतर घरं उध्वस्त झाली. याशिवाय आणखी 10 ते 12 जण बेपत्ता असल्याची भीती आहे. प्रशासनाचे लोक घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनडीआरएफ, स्थानिक पोलीस दल आणि स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. (Cloudburst in Himachal Pradesh And Uttarakahnd)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.