खलिस्तानच्या नावावर कॅनडामध्ये खलिस्तानींची मोठी वस्ती झाली आहे. कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी एक पोस्टर ट्विट केले आहे. याद्वारे त्यांनी खलिस्तानी भारत आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या विरोधात कसा मोठा कट रचत आहेत, हे सांगितले आहे. याचे उत्तर भारतीय वंशाच्या या खासदाराने दिले आहे. खलिस्तानींना सापाचा दर्जा देत त्यांनी त्यांचा नायनाट करण्याची भाषा केली आहे.
खलिस्तानच्या नावाने कॅनडात राहणारे खलिस्तानी दहशतवादी शनिवारी, 8 जुलै रोजी रॅली काढत आहेत. जो मोल्टनपासून सुरू होईल आणि टोरंटोमधील भारतीय दूतावासाकडे संपेल. या पोस्टरमध्ये खलिस्तानवाद्यांनी भारतीय दूतावासातील दोन अधिकाऱ्यांचे फोटो टाकले असून त्यांना मारेकरी म्हटले आहे. भारत आणि कॅनडाच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर हा सर्वात मोठा डाग म्हणून पाहिले जात असून, भारतीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेलाही हा मोठा धोका आहे.
खलिस्तानी गाठली खालची पातळी
चंद्र आर्य यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, खलिस्तानी कॅनडात सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. हिंसाचार आणि द्वेषाला प्रोत्साहन देऊन ते आमच्या स्वातंत्र्याचा आणि अधिकारांचा गैरवापर करत आहेत. ब्रॅम्प्टनमधील एका परेडमध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींची अंगरक्षकांनी हत्या केली, त्या आठवणींना उजाळा देऊन त्याचा उत्सव करण्यात आला, त्यावर निवडून आलेल्या सदस्यांकडून कोणतीही टीका केली नाही. त्यामुळे खलिस्तानींनी उघडपणे भारतीय अधिकाऱ्यांच्या विरोधात हिंसाचार करण्याचे आवाहन केले आहे. कॅनेडियन अधिकारी याची दखल घेत आहेत.
(हेही वाचा Tomato : पेट्रोलपेक्षाही टॉमेटो महाग; मुंबईत इतर भाज्यांचे काय आहेत नवे दर?)
Join Our WhatsApp Community