Dengue vaccine : वर्षभरात डेंग्यू व मलेरिया वर येणार लस

कोविशील्डच्या यशानंतर जगात पहिल्यांदाच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मलेरिया, डेंग्यूवर लस विकसित करणार आहे.

224
Dengue vaccine : वर्षभरात डेंग्यू व मलेरिया वर येणार लस
Dengue vaccine : वर्षभरात डेंग्यू व मलेरिया वर येणार लस

कोरोना वरील कोविशिल्ड या प्रभावी लसी नंतर  सायरस पूनावाला यांनी डेंग्यूबाबत मोठी घोषणा केली आहे. पुढील १ वर्षात डेंग्यू (Dengue) वरील उपचार घेऊन येणार आहोत. आम्ही १ वर्षात डेंग्यूवर उपचार आणि लस घेऊन येणार आहे. या नवीन लसीची आफ्रिकन आणि भारत देशात अत्यंत आवश्यकता आहे. ज्याठिकाणी लाखो लोख या आजाराने संक्रमित होतात असं सायरस पूनावाला यांनी म्हटलं आहे.

कोविशील्डच्या यशानंतर जगात पहिल्यांदाच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मलेरिया, डेंग्यूवर लस विकसित करणार आहे. या लसीमुळे आफ्रिकन देश आणि भारताला मोठा दिलासा मिळेल. याठिकाणी लाखो लोकं दरवर्षी या आजाराने संक्रमित होतात. गेल्या अनेक वर्षापासून सीरम इन्स्टिट्यूट डेंग्यूच्या व्हॅक्सिनवर काम करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी सीरमने एक रिपोर्ट समोर आणला. ज्यात एका माणसाला डेंग्यूची लस देण्यात आली. ती सुरक्षित आणि चांगले परिणाम देणारी ठरली. डेंग्यूची लस तयार करण्यासाठी सातत्याने चाचणी करण्यात येत आहे.

(हेही वाचा : MHADA Lottery : तर म्हाडाचा प्रतीक्षा यादीवरील १६९ अर्जदारांचे भाग्य उजळणार)

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी डेंग्यूची जी लस वर्षभरात आणणार असल्याचे सांगितले, त्यात डेंग्यूच्या सर्व स्ट्रेनचा उपचार होणार आहे. सीरमकडून लवकरच ही व्हॅक्सिन बाजारात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये देशातील औषध प्रसारासाठी जलदगती मंजुरीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अर्ज करण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. सीरमने तिचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी यूएसमधील बायोटेक्नॉलॉजी कंपनी (व्हिस्टेरा) सोबत एकत्र येऊन काम केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी १० ते ४० कोटी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.