देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात फडणवीस सहभागी होत असल्याने ते आता दिल्लीला जाणार आणि लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. या चर्चांना गुरुवारी, १६ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पूर्णविराम दिला असून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसून महाराष्ट्रातील राजकारणातच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
(हेही वाचा – Devendra Fadnavis : तत्व हाच प्राण आणि विचारांशी इमान हे बाळासाहेबांच्या राजकारणाचं मुख्य सूत्र ! )
गुरुवारी पत्रकारांनी केलेल्या अनौपचारिक गप्पांवेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले तसेच ते पुढे म्हणाले की, राजकारणात दहा दिवसांनंतर काय होईल, हे माहिती नसते, पण पुढील १० वर्षांनंतरही मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करेन, असे पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. निवडणुकांच्या काळात राज्यातील कटुता आणखी वाढतच जाते, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर ती कमी होईल, अशी शक्यता व्यक्त करताना ते म्हणाले की, पुढल्या वर्षी दिवाळी ‘सागर’ की ‘वर्षा’ बंगल्यावर साजरी करणार? यावरही फडणवीसांनी, ‘मी पुढील वर्षी दिवाळी सागर बंगल्यावरच साजरी करणार आहे. वर्षा शेवटी सागरालाच मिळते.’, अशी टिप्पणी केली आहे.
Join Our WhatsApp Community