सोनल शाह यांचा जन्म २० मे १९६८ साली मुंबई येथे झाला. १९७२ साली त्या चार वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब यूएसमध्ये राहायला गेलं. सोनल यांचं बालपण ह्यूस्टन, टेक्सास येथे गेलं. त्यांनी १९९० साली शिकागो युनिव्हर्सिटीतुन (University of Chicago) अर्थशास्त्र या विषयात बी.ए. चं पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी ड्यूक युनिव्हर्सिटीतून (Duke University) अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. (CEO Sonal Shah)
सोनल शाह या एक अर्थशास्त्रज्ञ आणि पब्लिक ऑफिसर आहेत. सोनल या ऑस्टिन, टेक्सास इथल्या एका नॉन प्रॉफिट न्यूज ऑर्गनायझेशनच्या सीईओ आहेत. ‘द टेक्सास ट्रिब्यून'(The Texas Tribune) असं या न्यूज ऑर्गनायझेशनचं नाव आहे. त्यांनी एप्रिल २००९ सालापासून ते ऑगस्ट २०११ सालापर्यंत व्हाईट हाऊस येथे ‘ऑफिस ऑफ सोशल इनोव्हेशन अँड सिव्हीक पार्टीसिपेशन’ या विभागाच्या संचालिका म्हणून काम सांभाळलं होतं. सोनल यांनी २०२० साली युनायटेड स्टेट्सच्या ‘नॅशनल पॉलिसी डायरेक्टर फॉर मेयर’च्या (National Policy Director for Mayor) निवडणुकीसाठी पीट बटगीग यांच्याकरिता राष्ट्रीय धोरण संचालिका म्हणूनही काम सांभाळलं.
(हेही वाचा – Lok sabha Election 2024: मुंबई उपनगरातील मतदान केंद्रे झाली सज्ज! ७४ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क)
याव्यतिरिक्त सोनल शाह यांनी जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीतील ‘द बीक सेंटर फॉर सोशल इम्पॅक्ट अँड इनोव्हेशन’ या विभागात संस्थापक कार्यकारी संचालिका हे पद सांभाळलं. तसेच Google.org ची एक शाखा असलेली ‘द हेड ऑफ ग्लोबल डेव्हलपमेंट इंटिटीएटीव्हस’ नावाच्या कंपनीत ‘ओबामा बायडेन ट्रान्झिशियन प्रोजेक्ट’ च्या सोनल या सदस्या होत्या.
फेब्रुवारी २०२२ साली सोनल शाह यांनी प्रेसिडेन्स ऍडव्हायजरी कमिशनच्या ‘एशियन अमेरीकन्स अँड पॅसिफिक आयलँडर्स’ येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘मुख्य आयुक्त’ या पदाची शपथ घेतली. त्यानंतर मार्च २०२२ साली त्यांना ‘होमलँड सिक्युरिटी ॲडव्हायझरी काऊन्सिलच्या सदस्या म्हणून नियुक्त करण्यात आलं. पुढे १ जानेवारी २०२३ साली सोनल या ऑस्टिन, टेक्सास इथल्या एका नॉन प्रॉफिट न्यूज ऑर्गनायझेशनच्या सीईओच्या पदावर विराजमान झाल्या. (CEO Sonal Shah)
Join Our WhatsApp Community