मुख्यमंत्री पदाविषयी Eknath Shinde यांची स्पष्टोक्ती

225
राज्यात विधानसभा निवडणूकीत (Assembly Election 2024) महायुती मोठ्या संख्येने विजयी झाली आहे. तर महाविकास आघाडीचा चांगलाच सुपडा साफ झाला आहे. अशातच, मुंबईतील महत्वाच्या बैठका सोडून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक गावी गेल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आता या सर्व चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले असून, भाजपाच्या (BJP) निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार शिंदेंनी केला. (Eknath Shinde)
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी आपले ‘मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या होत्या. आम्हाला जनतेने यश प्रचंड मिळवून दिले. मी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला माझा आणि शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल. आमच्या मनात किंतू-परंतू नाही आणि इतर कुणाच्याही मनात नसावा,’ अशी स्पष्टोक्ती शिंदेंनी दिली. 
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का?
श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवर शिंदे म्हणाले, “या फक्त चर्चा आहेत. बाकी लोकं काहीही बोलतात. आमची अमित शाहांसोबत बैठक झाली आहे आणि मुंबईत आणखी एक बैठक होणार आहे, ज्यामध्ये मी, अजित पवार आणि त्या सभेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहोत. तसेच जनतेले आम्हाला भरभरुन दिले आहे, आमच्यावर मतांचा वर्षाव केला आहे, आता आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत.’
(हेही वाचा – CIDCO Lottery 2024: सिडकोच्या घरांसाठी ९५ हजार अर्जांची नोंदणी; घरांच्या किमतींची प्रतीक्षा)

माझ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मी कधीही रजा घेतली नाही: शिंदे
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मी आता ठीक आहे आणि निवडणुकीच्या विश्रांतीसाठी सातारा येथे आलो आहे. ते म्हणाले, “माझ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मी कधीही सुट्टी घेतली नाही. लोक मला सतत भेटायला येत होते, त्यामुळे माझी प्रकृती खालावली होती.” जनतेचे प्रश्न ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचेही काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पक्ष नेतृत्वाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगून ते म्हणाले, “मी पक्ष नेतृत्वाला माझा बिनशर्त पाठिंबा आधीच दिला आहे आणि त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देईन.” असे एकनाथ शिंदे म्हणाले होते.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.