संपूर्ण देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, अजूनही मुंबईसह राज्यात रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. याचमुळे आता लोकलसह सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या देखील ३० सप्टेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लोकल, मेल आणि एक्स्प्रेस सेवा बंद करण्यात आली होती. नंतर या निर्णयाला ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता मात्र ३० सप्टेंबरपर्यंत मेल, एक्स्प्रेस आणि लोकल बंद राहणार आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावणार
दरम्यान एकीकडे ३० सप्टेंबरपर्यंत जरी लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी देखील अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल मात्र सुरुच राहणार आहेत. मात्र नियमित एक्स्प्रेस, मेल आणि लोकल वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद असणार आहे.
Join Our WhatsApp Community