सामूहिक भोजनदान, भंडारा, प्रसादवाटप करण्यापूर्वी आता सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. धार्मिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमाना दरम्यान सामूहिक भोजनदान केले जाते. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारचे भोजन केल्यानंतर विषबाधा झाल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, सासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. (FDA)
(हेही वाचा – सामूहिक भोजनदान करणार आहात ? सरकारने घेतला मोठा निर्णय…)
अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी याची घोषणा केली आहे. सार्वजनिक उत्सव आणि सामूहिक भोजनादरम्यान सरकारची परवानगी घ्यावी लागणार असल्यामुळे विषबाधेसारखे प्रकार टळू शकतात.
सरकारची परवानगी घेतल्याने कार्यक्रमाचे आयोजक, तसेच या कार्यक्रमात ठेवण्यात आलेले मेन्यू यांची नोंद सरकारकडे राहील. तसेच या पदार्थांची गुणवत्त देखील तपासली जाईल, असे सांगितले जात आहे. (FDA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community