पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत मागील दोन दिवसापासून सुरू जी—20(G-20) गटाच्या शिखर परिषदेच्या समापनाची घोषणा केली. पुढच्या वर्षीची बैठक ब्राझिलमध्ये होणार असून पंतप्रधानांनी याचे अध्यक्षपद औपचारिकरित्या त्यांना सुपुर्द केले.
जी—20 (G-20)शिखर परिषदेच्या समापनाची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्कृत मधील श्लोकाचा उल्लेख करीत विश्व कल्याणासाठी प्रार्थना केली. जी—20 (G-20) गटाची पुढची बैठक ब्राझिलमध्ये होणार आहे. परंतु, नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत या गटाचे अध्यक्षपद भारताकडेच राहणार आहे. मागील दोन दिवसात प्रत्येक देशांनी आपल्या सूचना केल्या आहेत. आता त्या सुचनांच्या अंमलबजावणीकडे आपण सर्वानी लक्ष देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी यावेळी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी जी—20 (G-20) गटाची व्हरच्युअल बैठक घेण्याचा प्रस्तावही मांडला. मागील दोन दिवसात ज्या गोष्टींवर एकमत झाले आहे त्याचा आढावा या व्हरच्युअल बैठकीत घेता येईल. आपण सर्व जण या आभासी सत्रात सामील व्हाल, अशी अपेक्षा व्यक्त करीत पंतप्रधानांनी जी—20 गटाच्या शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा केली.
ब्राझीलने भारताचे कौतुक केले
लुला दा सिल्वा यांनी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना स्वारस्य असलेले मुद्ये उपस्थित केलेत यासाठी भारताने त्यांचे कौतुक केले. ब्राझील या वर्षी 1 डिसेंबर रोजी अधिकृतपणे G20 गटाचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, गरीब देशांच्या कर्जाच्या समस्येकडे लक्ष द्यावे लागेल. भूक संपवण्यासाठी जगाला प्रयत्न वाढवावे लागतील.
विकसनशील देशांसाठी अधिक प्रतिनिधित्व हवे आहे: डी सिल्वा
लुला दा सिल्वा यांनी सामाजिक समावेश, उपासमार विरुद्ध लढा, ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत विकास यांना G20 प्राधान्यक्रम म्हणून सूचीबद्ध केले. ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला आपली राजकीय ताकद टिकवून ठेवण्यासाठी नवीन विकसनशील देशांची कायमस्वरूपी आणि स्थायी सदस्य म्हणून गरज आहे. आम्हाला जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये विकसनशील देशांचे अधिक प्रतिनिधित्व हवे आहे. दरम्यान, भारताने आपल्या मुत्सद्येगिरीचा परिचय देत जी—20 गटात सामील सर्व देशांचे संयुक्त घोषणापत्राला मंजुरी मिळवून देण्यात यश मिळविले आहे. यासाठी शेरपा अमिताभ कांत आणि त्यांच्या दोन्ही सहका—यांचे खूप कौतुक होत आहे. जी—20 गटाच्या बैठकीत एक संयुक्त घोषणापत्र मंजूर व्हाव यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेरपा कांत यांची टीम अहोरात्र काम करीत होती.
(हेही वाचा : GST विभागातील माहिती अधिका-यांनी एकाच विषयावरील अर्जात दिले दोन वेगळे निर्णय)
रशिया—युक्रेन युध्दामुळे एका घोषणापत्रावर सर्व देश एकमत होतील की नाही ही भीती सुरवातीपासून सर्वाच्या मनात निर्माण झाली होती. मात्र, भारताच्या टीमने पुन्हा चीन, रशिया आणि पाश्चात्य देशांच्या प्रतिनिधींशी चर्चेची फेरी सुरू केली. यामध्ये भारताला ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशियाचा पूर्ण पाठिंबा मिळाला. या प्रयत्नांतून चीनला युक्रेनच्या मुद्द्यावर तयार केलेल्या लेखाशी सहमती मिळवून देण्यात भारताला यश आले. नंतर युरोपीय देशांनीही या परिच्छेदात लिहिलेल्या गोष्टीशी सहमती दर्शवली.सर्व देशांची मंजुरी मिळविण्यासाठी 200 तासात 300 बैठकांचे सत्र घेण्यात आले. रशिया आणि चीनसोबत दीर्घ स्वतंत्र चर्चा झाली, त्यानंतर शुक्रवारी रात्री अंतिम मसुद्यावर सहमती झाली.
जी-20 परिषदेत सहभागी होणारे सर्व देश चर्चा करण्यासाठी एका प्रतिनिधीची नियुक्ती करतो. त्यास शेरपा असे म्हटले जाते. G-20 शिखर परिषदेदरम्यान सदस्य देशांतील शेर्पा आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व करतात. या परिषदेत तो केवळ आपल्या नेत्यांना मदत करत नाही तर सर्व सदस्य देशांना आपल्या देशाच्या धोरणात्मक निर्णयांची माहिती देणे हे त्याचे काम असते. भारताने अमिताभ कांत यांना आपला शेर्पा बनवले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community