येत्या काही तासांत बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनारा काही काळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. खवळलेला समुद्र शांत होत नाही तोपर्यंत पर्यटकांना समुद्रकिनारी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला असून सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनने आपली रंगीत तालिम दाखवत जोरदार आगमन केले आहे. तर दुसरीकडे गणपतीपुळ्यातील समुद्रकिनारा अजस्त्र लाटेंसह समुद्राला आलेल्या उधाणाने चांगलीच दाणादाण उडवली आहे.
(हेही वाचा – बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; महाराष्ट्रासह ‘या’ राज्याला सतर्कतेचा इशारा, पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक)
किनाऱ्यालगत असणाऱ्या छोट्या दुकानदारांना बिपरजॉय चक्रीवादळामुळे उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांचा फटका बसत आहे. सलग दोन दिवस गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका बसत आहे. सुमारे साडेपाच मीटरहून अधिक उंचीच्या अजस्त्र लाटा किनाऱ्याला धडकत असल्यामुळे पर्यटांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community