Keral मध्ये पावसाचे थैमान; वायनाडमध्ये भूस्खलनात ५ जणांचा मृत्यू

142
Keral मध्ये पावसाचे थैमान; वायनाडमध्ये भूस्खलनात ५ जणांचा मृत्यू
Keral मध्ये पावसाचे थैमान; वायनाडमध्ये भूस्खलनात ५ जणांचा मृत्यू

केरळमध्ये (Keral) पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवार, ३० जुलैच्या पहाटे भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वायनाड (Wayanad) जिल्ह्यातील मेप्पाडी भागात हे भूस्खलान झाले आहे. या घटनेत दोन लहान मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. भूस्खलनात घडलेल्या ठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

(हेही वाचा – झारखंडमध्ये Mumbai-Howrah Mail चा अपघात; पाच डबे रुळावरून घसरले)

मेप्पाडी भागात मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारात भूस्खलानाची पहिली घटना घडली. त्यानंतर पुन्हा पहाटे चार वाजताच्या सुमारास आणखी एक भूस्खलन झाले. या घटनेत दोन्हीही भूस्खलानाच्या घटनेत आतापर्यंत समोर आलेल्या वृत्तानुसार पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक यामध्ये अडकले असल्याची शक्यता असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

दरम्यान, भूस्खलानाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. भूस्खलन झालेल्या भागात मदतकार्यासाठी अतिरिक्त एनडीआरएफची टीम देखील दाखल होत असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट

वायनाडमधील भूस्खलानाच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही एक्सवर (ट्विट) पोस्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, “भूस्खलनाच्या घटनेमुळे मी व्यथित झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या सर्वांसोबत आम्ही आहोत आणि जखमींसाठी प्रार्थना करतो. सर्व बाधितांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि तेथील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.