दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Election 2025 ) चित्र आता स्पष्ट झाले आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार आहे. भाजपा ४८ जागांवर आघाडीवर असून, आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान काँग्रेस (Congress) पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. परंतु, काँग्रेसचा हा भोपळाही आम आदमी पक्षाला भोवला आहे. अनेक जागांवर काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे आपचे उमेदवार थोडक्यात पराभूत झाले आहेत. त्यातून खुद्द अरविंद केजरीवालही सुटू शकले नाहीत. (Delhi Election 2025 )
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव झाला. पक्षाच्या बहुतेक उमेदवारांना त्यांची डिपॉझिटची (Congress Election deposit seized) रक्कम गमावली आहे. काँग्रेसच्या फक्त तीन उमेदवारांना त्यांचे डिपॉझिटचे पैसे वाचवता आले. त्यापैकी, कस्तुरबा नगर येथील अभिषेक दत्त हे दुसरे स्थान पटकावणारे एकमेव काँग्रेस नेते आहेत. या यादीत नांगलोई जाट येथील रोहित चौधरी आणि बादली येथील देवेंद्र यादव यांचा समावेश आहे. बहुतेक काँग्रेस उमेदवार भाजपा किंवा आप नंतर तिसऱ्या क्रमांकावर होते, परंतु काही जागांवर काँग्रेस उमेदवार एआयएमआयएम उमेदवारांपेक्षा मागे पडले. ज्यामध्ये मुस्लिम बहुल भागांचा समावेश आहे. बाकी ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६७ जागांवर काँग्रेसला डिपॉझिट रक्कमही वाचवता आलेली नाही.
(हेही वाचा – बांगलादेश सरकार हिंसाचारावर नियंत्रण आणणार ?; Operation Devil Hunt ला सुरुवात)
१५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला १५ वर्षे एकही जागा जिंकता आलेली नाही
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (Former CM Sheila Dixit) यांच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर सत्तेवरून हाकलून लावण्यात आलेले सरकार आतापर्यंत पुन्हा सत्तेत येऊ शकलेले नाही. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसच्या मतांचा वाटा दोन टक्क्यांहून अधिक वाढला आहे. काँग्रेसला सुमारे ६.४ टक्के मते मिळाली. तर २०२० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ४.२६ टक्के मते मिळाली. ही एकच गोष्ट काँग्रेससाठी काहीशी दिलासादायक मानली जात आहे. १९९८ ते २०१३ पर्यंत दिल्लीच्या राजकारणात सुवर्णकाळ पाहणाऱ्या काँग्रेसला सलग तीन वेळा विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community