Chia Seeds In Marathi: आहारात ‘या’ १० बियाणांचा समावेश करा, होतील आश्चर्यकारक फायदे

भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरातील जीवनसत्त्व ई आणि झिंकची कमतरता भरून निघते.

1065
Chia Seeds In Marathi: आहारात 'या' १० बियाणांचा समावेश करा, होतील आश्चर्यकारक फायदे
Chia Seeds In Marathi: आहारात 'या' १० बियाणांचा समावेश करा, होतील आश्चर्यकारक फायदे

आपल्या रोजच्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या, मांसाहारी पदार्थ, अंडी, सुकामेवा…इत्यादी अनेकविध पदार्थांचा समावेश असतो, मात्र बहुतांश वेळा बी-बियाण्यांचाही (10 Creative Ways to Use Marathi Seeds) आहारात महत्त्वपूर्ण आहेत, याविषयी खूपच कमी जणांना माहित असते, पण बिया अत्यंत पौष्टिक असतात. बी-बियाण्यांचा आहारात समावेश केल्यास अनेक आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात. पाहूया, बिया आणि त्यांचे फायदे… 

Photo courtesy Google 22

चिया बिया
चिया बियांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, लोह आणि पोटॅशियम आढळते. ओमेगा-३ फॅटी असिड यासह यामध्ये भरपूर खनिजे असतात. वजन कमी करण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी या बियांचा आहारात समावेश फायदेशीर ठरतो तसेच या बिया खाल्ल्याने त्वचा आणि केसांनाही लाभ मिळतो. फायबर, प्रोटीन, अनसॅच्युरेडेट फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक मायक्रोन्यूट्रिअट्ंस चिया सीड्समध्ये आढळतात. चिया बियाणे फळे किंवा व्हेज स्मूदी किंवा शेकमध्येही घालू शकता.

Photo courtesy Google 23

अळशी
आहारात अळशीचा समावेश करण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. लहान बाळालाही कफ झाल्यास छातीला अळशीचा शेक किंवा अळशीचा काढा प्यायला देतात. यामुळे कफ पातळ होऊन पडून जातो. अळशीत जीवनसत्त्व बी १, प्रथिने, मॅग्नेशियम,ओमेगा-३ फॅटी अॅसिड ही पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये सौंदर्यवर्धक गुणधर्म असल्यामुळे केस आणि त्वचेकरिता या आहारातील वापर फायदेशीर ठरतो.

Photo courtesy Google 24
भांग बिया किंवा Hemp Seeds
भांग बियांना हेम्प सिड्स असेही म्हटले जाते. या बियांमध्ये ओमेगा -३ फॅटी अॅसिड आणि ओमेगा -६ फॅटी अॅसिडनी समृद्ध असतात. यासोबतच प्रथिने, फायबर आणि आरोग्यासाठी उपयुक्त अँण्टीऑक्सिडंट्स या बियांमध्ये असतात.ह्रदय, त्वचा आणि हाडांचे आजार बरे होण्यासाठी या बिया उपयुक्त आहेत.

Photo courtesy Google 25

भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरातील जीवनसत्त्व ई आणि झिंकची कमतरता भरून निघते. जीवनतत्त्व ई त्वचेसाठी उपयुक्त आहे. त्वचा निरोगी आणि सुंदर राहते. शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या वाढते. व्हायरल इन्फेक्शनचे दुष्परिणाम टाळण्यासाठी या बिया गुणकारी ठरतात.

Photo courtesy Google 26

तीळ
तिळाचे लाडू, पापड्या, तिळाचं तेल या माध्यमातून आहारात तिळाचा वापर केला जातो. तीळ अत्यंत पौष्टिक असतात. कॅल्शियम, मॅंगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ असतात. तिळातील कॅल्शियम हाडांसाठी उपयुक्त ठरते. तिळात झिंक जास्त प्रमाणात असते त्यामुळे हाड मजबूत राहतात.

Photo courtesy Google 27

सूर्यफुलाच्या बिया
सूर्यफुलांच्या बियांमध्ये खनिजे, जीवनसत्त्व आणि प्रथिने असतात. यामुळे हाडे मजबूत राहतात. यामध्ये जीवनस्त्व ई, बी कॉम्प्लेक्स तसेच मॅग्नेशियमची मात्र मोठ्या प्रमाणावर असते, हे घटक ऑस्टियोपोरोसिस रुग्णांसाठी लाभदायक असते. या बियांमध्ये मॅग्नेशियमचा स्रोत चांगला असतो. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते.

Photo courtesy Google 28

खसखस
खसखसही आपल्याकडे स्वयंपाकघरात वापरली जाते. मसाल्याच्या पदार्थांमधील हा एक पदार्थ आहे. विशेषत: दिवाळीतील फराळात खसखशीचा वापर आवर्जून असतोच. यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. याशिवाय विविध प्रकारचे पौष्टिक घटकही असतात. शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात खसखशीचा वापर करतात. खसखशीला पॉपी सिड्स (Poppy Seeds)असेही म्हणतात.

Photo courtesy Google 29

बार्ली
बार्लीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, झिंक, कॉपर, अमिनो ऍसिड, फायबर, गॅग्नेज, कॅल्शियम (Calcium) आणि सेलेनियम सारख पोषक तत्व आढळतात. जव किंवा बार्लीच्या पाण्याच्या सेवनामुळे वजन कमी होण्यापासून (Weight Loss),कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यास मदत होते. बार्ली वाॅटर (barley water) मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

Photo courtesy Google 30

मखाणा
मखाणा हा अनेक पोषक तत्त्वांचा खजिना आहे. यात प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे असे अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे अनेक आहार तज्ज्ञदेखील मखाणा खाण्याचा सल्ला देतात. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. मखाणा रायता, मखाणा करी, मखाणा चाट अशा विविध रेसिपीजद्वारे आहारात मखाण्यांचा समावेश करू शकता.

Photo courtesy Google 31

मोहरी किंवा राई
रोजच्या फोडणीसाठी लोणच्यात मसाल्यासाठी राई लागतेच. राईला मोहरी बोलतात. मोहरीला इंग्रजीत मस्टर्ड, तामिळ आणि मल्याळममध्ये कडूगु, तेलुगूमध्ये अवालू, बंगालीमध्ये मोहोरी आणि पंजाबीमध्ये राई म्हटलं जातं. जगभरातील स्वयंपाकघरात मोहरी हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. स्कीन ग्लो होते: मोहरीमध्ये मायरोसिन, सिनिग्रीन सारखे घटक आढळतात. रात्रभर पाण्यात मोहरी घालून हे पाणी सकाळी त्वचेवर लावल्यास त्वचेचे अनेक प्रकारचे त्रास दूर होतात.मोहरीमध्ये कॅलरी कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते. मोहरीचे दाणे वात, पित्त आणि कफ नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. मोहरीच्या दाण्यांचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत.

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.