हिंदी महासागराच्या चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सागरी क्षमता वाढवणारी आयएनएस इम्फाळ मंगळवारी भारतीय नौदलात आधिकृतरित्या सामील होणार आहे. त्यामुळे नौदलाच्या ताकदीत आणखी भर पडणार आहे. (INS Imphal)
आयएनएस इम्फाळ ही जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून भारताचे स्वतःचे स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र डिस्ट्रॉयर आहे.तसेच ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव देण्यात आलेली ही पहिलीच युद्धनौका आहे. एप्रिल २०१९ मध्ये राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली होती. (INS Imphal)
(हेही वाचा : Pandit Madan Mohan Malviya : ’सत्यमेव जयते’ला लोकप्रिय बनवणारे पंडित मदन मोहन मालवीय जीवन परिचय)
यासाठी येत्या मंगळवारी ( २६डिसेंबर) मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थित या युद्धनौकेचा सैन्यदलात समावेश करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताच्या समृद्धी साठी ईशान्येकडील राज्यांचे महत्व यातून स्प्ष्ट होते. या जहाजांचे वजन ७४०० टन असून एकूण लांबी १६४ मीटर आहे.आयएनएस इम्फाळच्या बंदर आणि समुद्रात दीर्घ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्या यशस्वी झाल्यानंतरच २० ऑक्टोबर रोजी आयएनएस इम्फाळच्या बंदर आणि समुद्रात आयएनएस इम्फाळला भारतीय नौदलाकडे सोपविण्यात आले. यामुळे नौदलाच्या ताकदीत अजून भर पडणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community