मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बीआरएस नेत्या के कविता (K Kavita) यांनी कथित घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तिहार तुरुंगात चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या सीबीआयच्या याचिकेला विरोध करत न्यायालयात धाव घेतली आहे. (K Kavita)
(हेही वाचा – Ramtek Lok Sabha : रामटेकमध्ये काँग्रेसच्या अडचणी संपता संपेना; किशोर गजभिये यांना वंचितचा पाठिंबा)
न्यायालयाने शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (सीबीआय) कविताची तिहारमध्ये चौकशी करण्याची परवानगी दिली. कविता (K Kavita) यांची न्यायालयीन कोठडीत चौकशी करण्यासाठी सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश देण्यात आला. कविता (K Kavita) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १५ मार्च रोजी कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात अटक केली होती. (K Kavita)
(हेही वाचा – Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द; वंचितची घोषणा.. काय आहे कारण…)
मद्य धोरण गैरव्यवहाराशी संबंधित हवाला प्रकरणाच्या अनुषंगाने ईडीने कविता (K Kavita) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता सीबीआयकडून चौकशी होणार असल्याने कविता यांच्या अडचणीत भर पडली आहे. मुलाची वार्षिक परिक्षा असल्याने जामीन दिला जावा, अशा विनंतीची कविता यांची याचिका अलीकडेच न्यायालयाने फेटाळून लावली होती. दक्षिणेतील लॉबीला दिल्लीतील मद्यविक्रीचे परवाने प्राप्त व्हावेत, यासाठी कविता यांनी आम आदमी पक्षाला १०० कोटी रुपयांची लाच दिली असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. (K Kavita)
(हेही वाचा – IPL 2024 Mumbai Indians : यंदाच्या आयपीएल नंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?)
के. कविता (K Kavita) यांची बँक खाती पाहणाऱ्या बुची बाबू याच्या चॅटमधून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर कविता (K Kavita) यांची चौकशी करणे गरजेचे आहे. परिणामी त्यांच्या चौकशीस परवानगी दिली जावी, असा विनंती अर्ज सीबीआयने विशेष न्यायालयात दिला होता. यावर न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सीबीआयला संबंधित परवानगी दिली. (K Kavita)
हे पहा –
Join Our WhatsApp Community