मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा (Kashedi Ghat ) कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुला करण्याता आला होता. हा बोगदा आता वाहतुकीसाठी काही दिवस बंद राहणार आहे. या बोगद्याच्या मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या अपूर्ण कामाला गती देण्यासाठी ५ दिवस बोगद्यातील वाहतूक बंद राहणार आहे.
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) कशेडी बोगदा वन वे सुरू करण्यात आला होता. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांचा परतीचा मार्ग सुखकर झाला होता. कशेडी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते, मात्र हा बोगदा सुरू झाल्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना हा मार्ग खुला झाला असला, तरी परतीच्या प्रवाशांसाठी सध्या या घाटातून होणारी वाहतूक बंद आहे, कारण या बोगद्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्यात आलेला कशेडी बोगदा वाहतुकीसाठी पुढचे ५ दिवस बंद करण्यात आला आहे. बंदीच्या कालावधीत कशेटी घाटातील अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – marathi.hindusthanpost.com/…/india-vs-canada-indian-high-commissioner-vikram-doraiswami-ban-entering-into-gurudwara)
Join Our WhatsApp Community