Kashmir Pattern : काश्मिरमधील नरसंहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतभरात ‘काश्मीर पॅटर्न’! : राहुल कौल

168
काश्मिरमधील नरसंहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतभरात ‘काश्मीर पॅटर्न’! : राहुल कौल
काश्मिरमधील नरसंहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतभरात ‘काश्मीर पॅटर्न’! : राहुल कौल

काश्मिरी पंडितांचा नरसंहार कोणतेही सरकार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे तेथे ‘काश्मीर पॅटर्न’ राबवला जात आहे. त्यामुळे आज भारतात अनेक ठिकाणांवरून हिंदू पलायन करत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे अध्यक्ष राहुल कौल यांनी केले. ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘काश्मिरी पंडितांचा नरसंहार नाकारल्याने देशावर होणारा परिणाम!’ या विषयावर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर कर्नाटक राज्यातील चित्रपट निर्माते प्रशांत संबरगी, ‘संयुक्त भारतीय धर्मसंसदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य राजेश्वर आणि ‘राष्ट्र धर्म संघटने’चे अध्यक्ष संतोष केंचम्बा उपस्थित होते.

कौल पुढे म्हणाले की, जोपर्यंत काश्मिरमधील हिंदूंवरील अत्याचारांना नरसंहार मानले जात नाही, तोपर्यंत काश्मीर हिंदूंचे पूनर्वसन शक्य नाही. हा केवळ काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाचा विषय नाही, तर देशातील ६० हून अधिक ठिकाणी ‘काश्मिरी पॅटर्न’ वापरून इस्लामिक जिहादी डोके वर काढत आहेत, तेथील हिंदूंच्या रक्षणाचा विषय आहे. ज्या काश्मीरने भारताला भरतमुनी दिले, तो काश्मीर आज हिंदूविहीन झाला आहे. सद्यस्थितीत काश्मीरमधील ९९ टक्के मुसलमान जिहादी विचारांचे आहेत.

(हेही वाचा – बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती)

काश्मिरी पंडितांवर आक्रमण हे भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठीचे षड्यंत्र आहे. मागील एक हजार वर्षे काश्मिरी पंडितांवर इस्लामी आक्रमणे होत आहेत. वर्ष १९९० मध्ये काश्मिरी पंडितांनी केलेले पलायन हे काश्मीरच्या इतिहासातील ७ वे पलायन होते; मात्र प्रत्येक वेळी ते तेवढ्याच निर्धाराने काश्मीरमध्ये परतले होते. आज येथील ३७० कलम हटवण्यात येऊनही अद्याप काश्मिर हिंदूंसाठी सुरक्षित नाही, ही वस्तुस्थिती आहे. काश्मिरी पंडितांचा नरसंहार मान्य केला नाही, तर त्याचे प्रतिबिंब संपूर्ण भारतात दिसेल, असा इशाराही कौल यांनी या वेळी दिला.

या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.