Ajmer : ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याजवळील अतिक्रमणावर योगी सरकारचा बुलडोजर

81
Ajmer : ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याजवळील अतिक्रमणावर योगी सरकारचा बुलडोजर
Ajmer : ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याजवळील अतिक्रमणावर योगी सरकारचा बुलडोजर

राजस्थान प्रशासनाने अजमेर (Ajmer) येथील ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याजवळ (Khwaja Garib Nawaz Dargah) असलेल्या अवैध बांधकाम बुलडोझरने तोडले आहे. याठिकाणी संबंधित दुकानदाराने आणि इतर लोकांना मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु असताना दुकानदारांनी अधिकाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. तरीही प्रशासनाने कुठल्याही दबावाला न जुमानता कारवाई केलीच. ही घटना दि. २६ डिसेंबर रोजी घडल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. (Khwaja Garib Nawaz Dargah)

( हेही वाचा : DCM Eknath Shinde यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

अजमेर दर्ग्याच्या दिल्ली गेट आणि ढाई दिन का झोपडासह (Adhai Din Ka Jhopra) उर्वरित भागात अजमेर प्रशासनाच्या सहकार्याने महापालिकेने ही कारवाई केली. यावेळी महापालिकेने गल्लोगल्ली लावण्यात आलेल्या दुकांनांची अतिक्रमणे हटवली. विशेष म्हणजे, उरुसासाठी लाखो लोक याठिकाणी येणार असताना ही कारवाई करण्यात आली. (Khwaja Garib Nawaz Dargah)

दरम्यान कारवाई करण्याआधी प्रशासनाने दुकानदारांना याआधीही नोटीस बजावली होती. त्यातच दर्ग्याच्या सर्वेक्षणासाठी मागणी करणारी याचिका स्थानिक न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court ) आदेशानुसार याप्रकरणाची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.