कोविड बॉडी बॅग घोटाळ्याचा तपासामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना शुक्रवारी समन्स देण्यात आले. सोमवारी तपास अधिकारी यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.
कोव्हिडं १९ काळात मुंबई महानगर पालिकेने वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी कडून मोठ्या प्रमाणात बॉडी बॅग खरेदी करण्यात आलेल्या होत्या. या बॉडी बॅग खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर,मनपाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा :chetan singh :आरोपी सिंह यांची नार्को टेस्टची परवानगी न्यायालयाने नाकारली)
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने वेदांत कंपनीच्या काही संचालकांचे यापूर्वीच जबाब घेतलेले आहे़त. पोलिसांच्या प्रथम खबरी अहवालनुसार, पेडणेकर यांनी मुंबई मनपाच्या सेंट्रल परचेस डिपार्टमेंटचे डेप्युटी डीन हरिदास राठोड यांच्याशी कथितपणे संपर्क साधला. त्यांना वेदांत कंपनीला कंत्राट देण्याचे आणि सुरुवातीला विक्रेता म्हणून पात्र ठरलेल्या केअरोन सोल्यूशन एलएलपीची पात्रता रद्द करण्याची सूचना केली होती. मूळ किंमती पेक्षा अधिक दराने वेदांत कंपनीकडून बॉडी बॅग खरेदी करण्यात आले होते. या प्रकरणात पेडणेकर यांच्याकडे चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने किशोर पेडणेकर यांना समन्स पाठवले असून सोमवारी त्यांना मुंबई पोलीस मुख्यालयात असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community