मध्य रेल्वे मार्फत तांत्रिक कामासाठी दिनांक ३० मे २०२४ रोजी मध्यरात्री पासून ठाणे स्थानकात ६३ तासांचा विशेष जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक आणि भायखळा रेल्वे स्थानक तसेच हार्बर लाइनवरील छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते वडाळा येथे ३६ तासांचा विशेष जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे काही कंपण्यानी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी देण्याचा, तर काहींना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठानेही (Univarsity Off Mumbai) त्यांच्या नियोजित परीक्षा (Exam Postponed) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने शुक्रवारी अधिकृत परिपत्रकाचा माध्यमातून ही घोषणा केली आहे. (Local Railway Jumbo Block)
मध्य रेल्वेच्या (Central Railway) तांत्रिक कामासाठी दिनांक ३० मे २०२४ मध्यरात्रीपासून विशेष मेगा ब्लॉक घेतला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास जाताना गैरसोयीचे होऊ शकेल. म्हणून, शनिवार दिनांक १ जून २०२४ रोजीच्या होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच त्यादिवशी शिक्षक, अधिकारी/कर्मचारी यांना सुट्टी देण्यात असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. त्याऐवजी दुसरा शनिवार, दिनांक ८ जून रोजी सुट्टीच्या दिवशी विद्यापीठ कार्यालये सुरु ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात कार्यालय प्रमुख तसेच विद्यापीठाशी संलग्नित / संचालित महाविद्यालयांनी आपल्या अधिनस्त विद्यार्थी / कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – Bomb Threat : जम्मू-काश्मीरमध्ये विस्ताराच्या विमानात बॉम्बची धमकी )
४३ परीक्षा सुरळीत
३१ मे रोजी विविध विद्याशाखेच्या एकूण ४३ परीक्षा होत्या. पण रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा कोणताही परिणाम शुक्रवारच्या परीक्षेवर झाला नाही. विज्ञान शाखेच्या ३ परीक्षा, अभियांत्रिकी शाखेच्या २७ परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ८ परीक्षा, मानव्य विज्ञान शाखेची १ परीक्षा, आंतर विद्याशाखेच्या ४ परीक्षा या परीक्षा पार पडल्याची माहिती देण्यात आली. (Local Railway Jumbo Block)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community