उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद होत नाही, कारण..; Yogi Adityanath यांची विरोधकांवर सडकून टीका

54
उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद होत नाही, कारण..; Yogi Adityanath यांची विरोधकांवर सडकून टीका
उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद होत नाही, कारण..; Yogi Adityanath यांची विरोधकांवर सडकून टीका

लव्ह जिहाद (Love Jihad), लँड जिहादसाठी (Land Jihad) मविआ गठबंधन झाले आहे. तीन दिवसांपासून मल्लिकार्जुन खरगे माझ्यावर नाराज झाले आहेत, की मी अशी भाषा करतो. मात्र खरगेजी मी योगी आहे. माझ्यासाठी देश पहिले आहे. खरगे यांचं गाव हैदराबाद मधील एक गावात आहे. मुस्लिम लीगला प्रोत्साहित करण्याचं काम काँग्रेस करतेय. या संघटनेने हिंदूंना कापण्याचं काम केलं आहे. लोकसभेच्या वेळी झाली ती चूक पुन्हा होऊ देऊ नका. गणपती वर दगडफेक होईल, लव्ह जिहाद होईल आणि आता आरपार होईल. आमच्या उत्तरप्रदेश मध्ये लव्ह जिहाद आणि लँड जिहाद होत नाही, कारण यमराज इथं बसला आहे, अशा शब्दांत उत्तरप्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) सडकून टीका केली आहे.

(हेही वाचा – ज्यांच्या हातातून पैसा सुटला नाही, त्यांच्या बॅगेत काय असणार; Raj Thackeray यांची उद्धव ठाकरेंवर टीका)

अचलपूर विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण तायडे यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्या वेळी खासदार अनिल बोंडे, नवनीत राणांसह महायुतीचे इतर नेते देखील उपस्थित होते. (Maharashtra Assembly Election 2024)

आज सुरक्षा पण आहे आणि सन्मान पण आहे

या वेळी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुढे म्हणाले की, ये नया भरात है, नया भारत छेडना नही, नही तो ये छोडता भी नही. आजही काश्मीरमध्ये झेंडा फडकत आहे. हे सर्व काम इंदिरा गांधी, राजीव गांधी कोणीच नाही केलं. ते फक्त मोदी यांनी केलं. 2014 पूर्वी पाकिस्तान सीमेच्या आत येत होता, चीन पण घुसत होता. कोणी बोलायला तयार नव्हते. आम्हाला सांगत होते तुम्ही बोलू नका, संबंध खराब होतील. म्हणजे यांना संबंध बनवायचं होते. आज सुरक्षा पण आहे आणि सन्मान पण आहे. मी जेव्हा अयोध्या बद्दल बोलतो, तेव्हा पुन्हा मी त्याच मुद्द्याच बोलतो. 500 वर्ष भगवान राम मंदिर का झालं नाही. मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा 500 वर्षाचे स्वप्न पूर्ण झालं. अयोध्यामध्ये म मंदिर सुरू आहे, काशीमध्ये पण विकासकाम सुरू आहे. 50 हजार भाविक एकेवेळी दर्शन करू शकतात. हा नवा भारत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.