PM Narendra Modi : स्वत:ची १४ मुले असूनही पंतप्रधानांना देणार २५ बिघा जमीन; १०० वर्षांच्या मांगीबाईचा व्हिडीओ व्हायरल

120

मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील हरिपुरा जहागीरच्या एका छोट्या गावात रहाणाऱ्या मांगीबाई तंवर या १०० वर्षांच्या आजींनी आपली २५ बिघा जमीन पंतप्रधान मोदींच्या नावे केली आहे. आजीबाईंचा आपल्या स्वत:च्या १४ मुलांमधला लाडका मुलगा हा देशाचा पंतप्रधान आहे.

दरम्यान, मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपा कार्यकर्ते २२ जून २०२३ रोजी हरिपुरा जहागीर गावात विकास योजनांची पत्रके वाटण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान कार्यकर्ते मांगीबाई तंवर यांच्या घरी पोहोचले असता आजीबाई म्हणाल्या, पंतप्रधान मोदींचे पत्रक असेल तर द्या, इतर कोणाचे पत्रक असेल तर नको. भाजप कार्यकर्त्यांनी मांगीबाई तंवरांशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(हेही वाचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार २०२३’)

मांगीबाई व्हिडीओत म्हणाल्या आहेत की, त्यांनी पंतप्रधान मोदींना टीव्हीवर पाहिले आहे, परंतु आजपर्यंत त्यांना भेटू शकल्या नाहीत. त्यांनी पंतप्रधानांना समोरासमोर पाहिलेले नाही. मांगीबाईंना पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे आणि त्यांना आशीर्वाद देऊन पेन्शन वाढवण्याची मागणी करायची आहे. मांगीबाईंनी सांगितले की, त्यांना १४ मुले आहेत. १२ मुली आणि २ मुलगे. पण मांगीबाईंसाठी सर्वात लाडका मुलगा म्हणजे पंतप्रधान मोदी. त्यांच्या १४ ४ मुलांपेक्षा पंतप्रधान मोदी त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त आहेत. त्यामुळे मांगीबाईंना आपली २५ बिघा जमीन पंतप्रधान मोदींना द्यायची आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.