करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या (mahalakshmi mandir kolhapur) मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती अहवालातून आली समोर आली आहे. राज्यासह देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत तज्ज्ञ समितीने ८ पानी अहवाल न्यायालयाला दिला आहे. यात देवीच्या मूर्तीवर अनेक भागात तडे गेल्याचे नमूद केले आहे. अंबाबाई देवीच्या (mahalakshmi mandir kolhapur) मूर्तीची झीज का झाली याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
(हेही वाचा – )
अहवालात काय म्हटले आहे
पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी १४ व १५ मार्च रोजी मूर्तीची पाहणी केली होती. या पाहिणीचा अहवाल गुरुवारी न्यायालयात त्यांनी सादर केला. २०१५ साली अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी वापरण्यात आलेले साहित्य ही मृतीच्या मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ शकले नाही. यामुळे मूर्तीला तडे जाऊन थर निघत असल्याचे अहवालात म्हटले आहे. मूर्तीवरील अन्य ठिकाणच्या लेपाला देखील तडे गेले असल्याचे अहवालात म्हटले आहे. यावर उपाय म्हणून मूर्ती भक्कम करण्याकरता येथील सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तडे बूजवता येतील तसेच मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे लागतील. (mahalakshmi mandir kolhapur)
(हेही वाचा – )
या ठिकाणी झालीय मुर्तीची झीज
सुनावणी प्रसंगी अॅड. नरेंद्र गांधी, वादी गजानन विश्वनाथ मुनीश्वर, अॅड. ओंकार गांधी, लाभेश मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर, प्रतिवादी दिलीप देसाई, अॅड. प्रसन्न मालेकर आदि उपस्थित होते. अंबाबाई महालक्ष्मी मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची प्रमुक्याने झीज झाली आहे, तसेच देवीचे नाक, ओठ, हनुवटी यावर तडे गेले असल्याचे अहवालात म्हटले आहे. (mahalakshmi mandir kolhapur)
हे पहा –
Join Our WhatsApp Community