Dr. Narendra Dabholkar : हत्या प्रकरणी ‘सीबीआय’ तपासाचा अहवाल १३ सप्टेंबरला न्यायालयात

आतापर्यंत सीबीआयकडून याप्रकरणात २० साक्षीदारांची साक्ष नोंदविली.

200
Maharashtra Superstition Dr. Narendra Dabholkar : हत्या प्रकरणी ‘सीबीआय’ तपासाचा अहवाल १३ सप्टेंबरला न्यायालयात
Dr. Narendra Dabholkar : हत्या प्रकरणी ‘सीबीआय’ तपासाचा अहवाल १३ सप्टेंबरला न्यायालयात

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Superstition Eradication Committee) कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोळकर (Dr. Narendra Dabholkar) हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी मंगळवारी (५ सप्टेंबर) पूर्ण झाली. सीबीआयने आतापर्यंत केलेल्या तपासाबाबतचा अंतिम अहवाल १३ सप्टेंबर रोजी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.दरम्यान, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागातील डाॅ. अजय तावरे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रानगट, तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी पूर्ण झाली आहे.

सीबीआयने निश्चित केलेल्या सर्व साक्षीदारांची साक्ष, तसेच उलटतपासणी पूर्ण झाली आहे. याप्रकरणात आणखी काही साक्षीदार न्यायालयात सादर करायचे असल्यास याबाबतची यादी सीबीआयला न्यायालयात सादर करावी लागणार आहे. तपासाबाबतचा अंतिम अहवाल, तसेच नव्याने काही साक्षीदार निश्चित केल्यास त्यांची नावे १३ सप्टेंबर रोजी न्यायालयात सादर केली जाणार आहे, अशी माहिती सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.

(हेही वाचा  : Arun Kumar Sinha Death : पंतप्रधानांना सुरक्षा पुरवणारे एसपीजी प्रमुख अरुणकुमार सिन्हा यांचं निधन)

दाभोलकर कुटुंबियांच्या दबावाखाली काही निरपराध लोकांना अटक केली का असे सिंग यांना विचारले असता त्यांनी नाही असे उत्तर दिले.डाॅ. दाभोळकर हत्या प्रकरणात डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे, ॲड. संजीव पुनाळेकर यांच्याविरुद्ध आराेप निश्चित करण्यात आले आहेत. डाॅ. दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची बचाव पक्षाकडून उलटतपासणी घेण्यात आली. मंगळवारी (५ सप्टेंबर) उलटतपासणी पूर्ण झाली. ॲड. सुवर्णा वस्त यांनी सिंग यांची उलट तपासणी घेतली. आतापर्यंत सीबीआयकडून याप्रकरणात २० साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यांची उलटतपासणी घेण्यात आली.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.