राज्यात ई-पास रद्द होणार, लोकल- मेट्रोला मुख्यमंत्र्यांचा विरोध कायम

108

केंद्र सरकारने दिलेल्या सुचनेनुसार राज्यात ई-पास रद्द होण्याची शक्यता असून, आज राज्यसरकार हा निर्णय घेणार अशी माहिती मिळत आहे. राज्य सरकार अनलॉक ४ च्या दिशेन पाऊल टाकत असून, आज अनलॉक ४ ची नियमावली जाहीर होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.

रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरु होणार 

दरम्यान राज्यातील रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरु होणार असल्याचे देखील समजते. मात्र मंदिरे आणि व्यायामशाळा सुरु करण्याबाबत अजूनही सरकार सकारात्मक नसल्याची देखील माहिती मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरकारी कार्यालयातील उपस्थिती देखील वाढवण्याची शक्यता असून,आता ३० टक्के उपस्थिती करण्याचा सरकारचा विचार आहे.

WhatsApp Image 2020 08 27 at 2.55.37 PM

लोकल-मेट्रोला विरोध कायम

एकीकडे केंद्र सरकारने मेट्रो सुरु करण्याला परवानगी दिली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लोकल आणि मेट्रो सुरु करण्याला विरोध कायम आहे. जोवर परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत राज्य सरकार लोकल आणि मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही अशी देखील माहिती मिळत आहे.

oie 27141156g7HbmktY

दरम्यान अनलॉक ४ मध्ये मेट्रो 7 सप्टेंबरपासून सुरू करता येऊ शकेल असे केंद्र सरकारने सांगितले आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय (एमओएचयूए) तसेच रेल्वे मंत्रालय (एमओआर) व एमएचएच्या चर्चेनंतर मेट्रो रेल्वेला ७ सप्टेंबरपासून श्रेणीबद्ध पद्धतीने ऑपरेट करण्यास परवानगी केंद्र सराकरने दिली आहे. शिवाय व्यक्ती आणि वस्तूंच्या आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

अशी असेल अनलॉक ४ ची नियमावली

  • कंटेनमेंट झोनबाहेर लॉकडाऊन नाही
  • कंटेनमेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन
  • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
  • ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेत ५० टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावता येणार
  • २१  सप्टेंबरपासून फक्त १०० जणांच्या सहभागात सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना मंजुर
  • मोकळ्या जागांवरील (ओपन एअर) थिएटर २१ सप्टेंबरपासून सुरु करता येणार
  • सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर्स बंदच राहणार
  • आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंदच राहणार
  • २१  सप्टेंबरनंतर लग्न समारंभास ५० ऐवजी १०० वऱ्हाड्यांची उपस्थित राहता येणार
  • २१  सप्टेंबरनंतर अंत्यसंस्कारासाठी २० ऐवजी १०० जणांना हजर राहता येणार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.