ख्रिस्ती पंथीयांमध्ये christian अजूनही जीवघेणी अंधश्रद्धा अस्तित्वात आहे. सोशल मीडियावर पाद्रींचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यात हे पाद्री ज्यास वैद्यकीय उपचारांची नितांत गरज असते असे अतिशय त्रासदायक आणि गंभीर रोग येशूच्या नावाने बरे करताना दिसतात. पढवून आणलेले टुकार अभिनेते अशा प्रकारे बरे होताना पाहून सयंघोषित पुरोगाम्यांची अंधश्रद्धा निर्मुलन समिती कुठे शेण खायला गेली आहे असा प्रश्न आपल्याला पडतो.
आता दक्षिण आफ्रिकेतील केन्या या देशात ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या christian मूर्खपणामुळे आणि अंधश्रद्धेमुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे. ही घटना अतिशय धक्कादायक आहे आणि विस्तारवादी व एकेश्वरवादी पंथ किती घातक असू शकतात याचे हे मुख्य उदाहरण आहे. येशूला भेटण्यासाठी काही लोक पाद्रीकडे गेले आणि त्यांचे मृतदेह सापडले अशी भयावह घटना घडली.
सुमारे ६० मृतदेह सापडले असून आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. या पाद्रीचे आणि आरोपीचे नाव आहे पॉल मिकेंजी. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार मकेंजीच्या शेतामध्ये अनेक कबर सापडल्या आहेत, यामध्ये मृतदेहांना व्यवस्थित दफन केलं नव्हतं. १४ एप्रिल रोजी या आरोपी ख्रिस्ती christian पाद्रीला अटक करण्यात आली आहे. ज्यांचे मृतदेह मिळाले ते सर्वजण या पाद्रीचे अनुयायी होते.
या पाद्रीने लोकांना सांगितलं होतं की, जर तुम्हाला येशूला भेटायचं असेल तर मरेपर्यंत उपाशी राहावं लागेल. आणि भूकेमुळे त्या सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय विचित्र आणि विक्षिप्त अशी घटना आहे. अटक केल्यानंतरही पाद्रीला अक्क्ल आलेली नाही. त्याने तुरुंगात उपोषण केले होते. पाद्रीच्या शेतात अजूनही मृतदेह सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अशा घटना रोखण्यासाठी सावरकरांनी सांगितल्यानुसार एकेश्वरवादी उपासकांनी पोथी निष्ठेचा त्याग विज्ञानवाद स्वीकारायला हवा.
Join Our WhatsApp Community