PM Modi :काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप ; पंतप्रधान मोदींचा घणाघात

आजची कॉँग्रेस भारताला पुढे नेऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींनी विरोधकांना खडसावले

253
PM Modi :काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप ; पंतप्रधान मोदींचा घणाघात

लोकसभा २०२४ (Lok Sabha 2024) ची निवडणुक जवळ आली असून, राज्यात प्रचारांचे वारे वाहू लागले आहेत. परिणामी विरोधी पक्षातील नेतेमंडळी सत्ताधारी पक्षांवर आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहानपूरमद्धे झालेल्या सभेतून काँग्रेस, सपा आणि इंडिया आघाडीवर (India) जोरदार टीका केली. आजची काँग्रेस भारताला पुढे नेऊ शकत नाही. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे वर्णन “मुस्लिम लीगची छाप” अशा कडक शब्दात वर्णन करत काँग्रेस पक्षावर जहरी टीका केली. (PM Modi)

(हेही वाचा – Fire : नायर रुग्णालयातील दंत विभागाच्या इमारतीला आग

इंडिया आघाडी फक्त कमिशनसाठी, तर एनडीए मिशनसाठी 

पंतप्रधान मोदी भाषणात पुढे म्हणाले की, मी देशाला झुकू देणार नाही, मी प्रत्येक परिस्थिती बदलेन, तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी पुन्हा राहुल गांधींच्या ‘शक्ती’ विरोधात वक्तव्यावर टीका केली आहे. पण इंडिया आघाडीचे लोक शक्तीलाच आव्हान देत आहेत. हे देशासाठी दुर्देवी आहे. अशी खंत मोदींनी बोलून दाखवली. तर गरिबांचे कल्याण, हे भाजपासाठी निवडणूक घोषणा नसून भाजपाचे ध्येय आहे. देशात इंडिया आघाडी फक्त कमिशनसाठी असून, तर एनडीए (NDA) मिशनसाठी आहे. कॉँग्रेसने जे दोन दशकात करू शकले नाही, ते भाजपने दोन दशकात करून दाखवले. असंही मोदी भाषणात म्हणाले. (PM Modi)

(हेही वाचा – MNSच्या गुढी पाडवा मेळाव्यावर वेगळ्या कॅमेरांची नजर; कोणते असतील ते कॅमेरे, जाणून घ्या)

तुमच्यामुळे देशाचे नाव जगभरात घुमत आहे.  
२०१४ (2014)पूर्वीचे दिवस आठवा. काँग्रेस पक्ष सामन्य जनतेला दिशाभूल करत त्यांचे अधिकार मर्यादित करायचे. मी तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी शिव्या खात आहे. भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी ते रॅली, मोर्चे काढत आहेत. मी प्रत्येक परिस्थिती बदलेन, निराशेला आशेत बदलेन. मेहनतीत मी कोणतीही कसर सोडली नाही. तुमच्यामुळे भारताचे नाव जगभरात घुमत आहे. असेही मोदी म्हणाले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हरियाणाचे मुख्यमंत्री श्री नायब सिंह सैनी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धामी व अन्य भाजपा नेते याप्रसंगी उपस्थित होते. (PM Modi)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.