मुंबई दूध उत्पादक संघाने 1 सप्टेंबरपासून शहरातील म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात (Mumbai Milk Price) प्रति लिटर 2 रुपये दरवाढ जाहीर केली आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या आधीच एमएमपीएच्या (MMPA) अधिकाऱ्यांनी ही दरवाढ जाहीर केली आहे. टोमॅटो आणि कांदा झाल्यानंतर आता दूध महागल्यामुळे मुंबईकरांच्या महिन्याच्या बजेटमध्ये पुन्हा बदल होणार आहे. मुंबईचे 700 दूध डेअरीमालक आणि 50 हजार म्हशींचे मालक यांच्या मुंबई दूध संघाची बैठक २६ ऑगस्ट या दिवशी जोगेश्वरी येथे पार पडली. या बैठकीत एमएमपीएचे उपाध्यक्ष रमेश दुबे यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी इत्यादी सणांमध्ये दुधाशी संबंधित सर्व खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – मुंबईकरांना आता दुधाचा चटका ; सुट्या दुधाच्या दरात होणार ‘इतकी’ वाढ)
ओला चारा आणि पशूखाद्यांच्या दरात वाढ झाल्याने मुंबई दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईत किरकोळ विक्रीचे म्हशीचे सुटे दूध (Mumbai Milk Price) प्रति लिटर 2 ते 3 रुपयांनी महागणार आहे, तर घाऊक दरातही २ रुपयांची वाढ होणार आहे. म्हशीच्या दुधात 1 मार्च नंतर दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. आता पुन्हा झालेल्या दरवाढीमुळे दुधाच्या मागणीवरही काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मुंबईत दररोज 50 लाख लिटरहून अधिक म्हशीच्या दुधाचा पुरवठा केला जातो. यापैकी 700,000 लीटरपेक्षा जास्त दूध हे एमएमपीएच्या डेअरी आणि संबधित लोकांकडून पुरवले जाते.
एमएमपीए समितीचे सदस्य सी.के. सिंग याविषयी माहिती देताना म्हणाले, “मुंबईत 3,000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांद्वारे विकल्या जाणार्या म्हशीच्या दुधाची किंमत 85 रुपये प्रति लीटर वरून 87 रुपये प्रति लीटर केली जाईल. ती ६ महिन्यांसाठी लागू राहील, त्यानंतर त्याचा आढावा घेतला जाईल. 1 सप्टेंबरपासून 2 रुपये प्रति लीटर किंवा 85 रुपये प्रति लीटर वरून 87 रुपये प्रति लीटरच्या दरात वाढ झाल्याने, किरकोळ दर 90 रुपये प्रति लीटरपर्यंत किंवा 95 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.” (Mumbai Milk Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community