मुंबई पोलीस दलातील एक पोलीस हवालदार गुटखा तस्करीच्या बेकायदेशीर धंद्यात गुंतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खाजगी वाहनाला पोलीस नावाचा बोर्ड लावून गुटख्याची तस्करी सुरू होती अशी माहिती पालघर पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात करण्यात आले आहे.
मोसीन शेख असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.मोसीन शेख हा मुंबई पोलीस दलात असून नायगाव स्थानिक शस्त्रास्त्र विभागात कार्यरत होता. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची तस्करी करतांना गुजरात-महाराष्ट्र सीमेवर शेखला पालघर जिल्हयातील कासा पोलिसांनी ५ ऑक्टोबरला अटक केले होते.अटके नंतर, पोलिस तपासात तो दोषी आढळला, ज्यामुळे विभागीय कारवाईद्वारे त्याचे निलंबन करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पदाचा गैरफायदा घेत शेख गुजरात मधून मुंबईत गुटख्याची वाहतूक करायचा. पोलिसांना त्याच्या कारवायांची माहिती मिळाली आणि त्याला कासा पोलिसानी पावणे तीन लाख रुपयांच्या बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आला होता. पोलीस हवालदार मोसीन शेख ला अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता, याप्रकरणी कासा पोलिसांनी मोसीन शेखला अटक केली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की शेखने संशय येऊ नये म्हणून स्विफ्ट कारवर पोलिसांचा बोर्ड लावला होता, परंतु कासा पोलिसाना खात्रीशीर माहिती होती, मोसीन शेख गुटख्याची तस्करी करीत आहे, या माहितीवरून पोलिसानी शेख याचे खाजगी वाहन थांबवून त्याला गुटख्यासह ताब्यात घेण्यात आले.
(हेही पाहा –https://www.youtube.com/watch?v=tl5j5e7f2zQ0 )