स्वातंत्र्यदिना सोबत लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक जण देवदर्शन तर कोणी थंड हवेची ठिकाणे अशा पर्यटनस्थळी भेट देत आहेत. यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगाच लागल्या आहेत. या सुट्ट्यांमुळे लोक मुंबईतून बाहेर पडली असल्याने शनिवार सकाळपासूनच मुंबई-पुणे द्रुतगती Mumbai-Pune Expressway मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
(हेही वाचा –IND vs WI T20I : चौथ्या सामन्यात भारताचा ९ गडी राखून विजय)
पर्यटकांनी आपले खाजगी वाहन रस्त्यावर आणली आहेत. यामुळे खंडाळा बोरघाटात तब्बल १२ किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. सुट्ट्यांमुळे लोणावळा, महाबळेश्वर कोल्हापूर अशा पर्यटनस्थळाकडे मोठी गर्दी झाली आहे.देवस्थानान मध्येही भाविकांनी चांगलीच गर्दी केली आहे. तर कोल्हापूर,नाशिक,शिर्डी येथील प्रसिद्ध मंदिरां मध्येही भाविकांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत १६ तारखेपर्यंत सलग चार दिवस सुट्ट्या आहेत आणि पावसानेही काहीशी विश्रांती घेतली आहे. शिवाय कोकणाचे निसर्ग सौंदर्य ही अधिक खुलले आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ हा कोकणाकडेही वाढला आहे. त्यामुळे कोकणाकडेही जाणारे मार्ग हे ही संपूर्ण जाम आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community