मुंबई, (Mumbai Rain) पुण्यासह आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागात रविवार ९ जून रोजी रात्री जोरदार पाऊस कोसळला. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ११ जूनच्या सुमारास होणार होते. मात्र दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे.
दादरमध्ये जोरदार पाऊस झाला. पूर्व उपनगरात (eastern suburbs) पावसाच्या सरी कोसळल्या. पुण्यात डेक्कन रोड, घोले रोड, लॉ कॉलेज रोड, एसबी रोड परिसरात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने ११ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता.
धाराशिवमध्येही मुसळधार पाऊस झाला. धाराशिव शहरातील फकीरानगर, गणेश नगर, समर्थ नगर, वैराग नाका परिसरात गटारांना नदीचं स्वरूप आले. पावसाचा जोर पाहायला मिळत असल्याने धाराशिव मधील शेतकऱ्याच्या पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाचे आगमन झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(हेही वाचा – Modi Government 3.0 : एकूण ७२ मंत्री, महाराष्ट्राच्या वाट्याला ६ मंत्रीपदे)
पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी साचलं
धाराशिव (Dharashiva) परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात शहरातील फकीरा नगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यात गेल्याने नागरिकांचे मोठं नुकसान झाले आहे. घरातील ज्वारी भरून ठेवलेली पोती पाण्यात भिजल्याने ज्वारी आणि धान्याचे मोठं नुकसान झालं आहे. आपल्या घरातील पाणी बादलीने उपसून बाहेर काढण्याचा प्रयत्न लोक करत आहेत. या भागातील गटारे तुडुंब भरून रोडवर पाणी जमा झाल्याने हेच पाणी लोकांच्या घरांमध्ये घुसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community