Municipal Hospital: महापालिकेच्या रुग्णालयांत मुंबईबाहेरील रुग्णांकरिता स्वतंत्र शुल्क आकारणार, इक्बालसिंह चहल यांची माहिती

मुंबई महानगरपालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात "मुख्यमंत्री आरोग्य आपल्या दारी" अंतर्गत "आरोग्यम् कुटुंबम्" हा कार्यक्रम अधिक सक्षम करण्यात येत आहे.

567
Municipal Hospital: महापालिकेच्या रुग्णालयांत मुंबईबाहेरील रुग्णांकरिता स्वतंत्र शुल्क आकारणार, इक्बालसिंह चहल यांची माहिती
Municipal Hospital: महापालिकेच्या रुग्णालयांत मुंबईबाहेरील रुग्णांकरिता स्वतंत्र शुल्क आकारणार, इक्बालसिंह चहल यांची माहिती

विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या (Municipal Hospital) रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात. याचा परिणाम मुंबईतील करदात्या जनतेवर होत असून मुंबईतील रुग्णांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मुंबईबाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्याचा विचार महापालिका प्रशासन करत असून यासाठीचा स्वतंत्र शुल्क रचनेबाबत अभ्यास सुरू असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल (Administrator Iqbal Singh Chahal) यांनी सन २०२४-२५चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मांडताना स्पष्ट केले, मात्र झिरो प्रिस्क्रिप्शनचा लाभही केवळ मुंबईच्या हद्दीत राहणाऱ्या मुंबईकरांनाच मिळेल, असेही चहल यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या सन २०२४- २५ च्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी एकूण ७,१९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याप्रसंगी चहल यांनी रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS) रुग्णसेवेत सुसूत्रीकरण आणि पारदर्शकता आणण्याकरिता महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक माहिती-तंत्रज्ञान प्रणालीअंतर्गत HMIS सेवांचा अवलंब करण्यात येणार असल्याचे सांगत या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३०६ कोटी रुपये एवढा आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा –Governor Ramesh Bais: विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत – राज्यपाल रमेश बैस )

असंसर्गजन्य रोग कक्ष
मुंबई महानगरपालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात “मुख्यमंत्री आरोग्य आपल्या दारी” अंतर्गत “आरोग्यम् कुटुंबम्” हा कार्यक्रम अधिक सक्षम करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत, मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक आरोग्य आणि मोठया प्रमाणात आढळणारे कर्करोग (oral, breast and cervix) या आजारांची तपासणी करुन संशयित रुग्णांना पुढील निदान करण्याकरिता संदर्भ सेवा देणे, वयोवृध्द तसेच संवेदनशील नागरिकांची घरी जाऊन रक्त तपासणी करणे व त्यांच्या रोगाच्या पुढील उपचारांचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.

कर्करोग नियत्रण मॉडेल
तसेच, सन २०२४-२५ मध्ये, “कर्करोग नियंत्रण मॉडेल” (Cancer Prevention Model) स्थापन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये oral, breast आणि cervical कर्करोग नियंत्रणाकरीता विभाग पातळीवर निदान व संदर्भ सेवा देण्यात येणार असून त्यामध्ये सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचा समावेश असेल.

ह्रदयविकारामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी
सन २०२४-२५ मध्ये, प्रायोगिक तत्त्वावर “हृदय संजीवनी” प्रस्ताविण्यात येईल आणि हृदयविकारामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी, केंद्र शासनाच्या NCD-STEMI प्रकल्पांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निदान व उपचार सेवा देण्यात येणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना
सन २०२२-२३ मध्ये, प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी २०२ “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू करण्यात आले आहेत. पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टीक सेंटरमध्ये नागरिकांना दंतचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, त्वचारोगतज्ञ आणि नेत्रतज्ञ, इ. तज्ञांच्या सेवा पुरविण्यात येत आहेत, मात्र येत्या वर्षांत ६ अतिरिक्त पॉलिक्लिनीक व डायग्नॉस्टिक सेंटर्स आणि ५४ “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना” अशा प्रकारे एकूण ६२ दवाखाने सुरू करण्यात येणार आहे तसेच फिजिओथेरपिस्ट आणि कान, नाक, घसा तज्ञांच्या सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या पॅनलवरील खाजगी डायग्नोस्टीक सेंटरद्वारे एक्स रे, ईसीजी,सिटी स्कॅन, आणि एमआरआय आदींची सेवा घेण्यात येणार आहे. नायर धर्मादाय रुग्णालयातील समर्पित ओन्कोलॉजी विभाग व आपत्कालीन विभाग इमारत आणि के. ई. एम. रुग्णालयातील शताब्दी इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. याबरोबरच सायन रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत, नर्सिंग कॉलेज व आर.एम.ओ. वसतीगृहाचा समावेश असलेला पहिला टप्पा पूर्णत्वास येत असून रुग्णालय इमारतीचा समावेश असलेल्या दुसऱ्या टप्प्याकरीता निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले.

स्वायत्त विद्यापीठाची स्थापना
स्वायत्त विद्यापीठ तथा मानीव विद्यापीठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार, वैद्यकीय आणि पॅरामेडीकल शिक्षणाच्या सर्वसमावेशक अभ्यासक्रमांचा समावेश असणाऱ्या स्वायत्त विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी एक अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. उपनगरातील वाढती लोकसंख्या आणि प्रमुख रुग्णालयांवर येणारा तिचा ताण विचारात घेता महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित व कुशल कर्मचारी वर्गाच्या सहाय्याने सर्व प्रकारच्या विशेष व अतिविशेष सेवा उपलब्ध करून देण्याकरीता विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबविले जात आहेत. सन २०२०-२१ मध्ये, १६ उपनगरीय रुग्णालयांपैकी ६ रुग्णालयांमध्ये DNB अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली असून एकूण १७२ तज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे व १० विषयांत प्रतिवर्षी ७९ जागा उपलब्ध झाल्या आहेत. या उपक्रमामुळे, जटील व अतिविशेष शस्त्रक्रिया उपनगरीय रुग्णालयात पार पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अशाप्रकारे रुग्णालयांच्या बांधकामांवर खर्च –
– भगवती रुग्णालयाचा पुनर्विकास ११० कोटी रुपये
– पंडित म.म. मालविय शताब्दी रुग्णालय, गोवंडी ९२.८४ कोटी रुपये
– सायन रुग्णालय (टप्पा-१) ८५ कोटी रुपये
– शताब्दी रुग्णालय, कांदिवली (प) ६९ कोटी रुपये
– म.तु. अगरवाल रुग्णालय, मुलुंड ६४.५४ कोटी रुपये
– एल. विभागातील संघर्ष नगर रुग्णालय ५५ कोटी रुपये
-वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण ५०.४५ कोटी रुपये
– भांडूप येथील मल्टीस्पेशालिटी मनपा रुग्णालय ४५ कोटी रुपये
– नायर रुग्णालय (एल शेप बिल्डिंग) ३६.७० कोटी रुपये
– सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास ३६.६८ कोटी रुपये
– ओशिवरा प्रसुतीगृह ३३ कोटी रुपये
– एक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालय ३२ कोटी रुपये
– नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास २७ कोटी रुपये
– हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आपला दवाखाना १०० कोटी रुपये
– सायन कोळीवाडा वसतिगृह १८ कोटी रुपये
– असंसर्गजन्य रोग कक्ष १२ कोटी रुपये

 हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.