विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी २०२२ साली हिंगोली व अकोला येथे जाहीर सभेत आणि पत्रकार परिषदमध्ये बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या संबंधित काही आक्षेपार्ह विधाने केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी म्हणून निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी राहुल गांधींच्या विरोधात 499 व 504 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी नाशिक जिल्हा न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायाधीश दीपाली कडुस्कर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात समन्स बजावले.
कोणत्या विधानावर घेतला आक्षेप?
- स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांनी स्वातंत्र्यवीर ही पदवी स्वतः घेतली होती.
- सावरकर हे काही दिवसच तुरुंगात राहिले.
- सावरकर हे बीजेपी व संघाचे जीन होते.
- सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली ते माफीवीर होते
(हेही वाचा Veer Savarkar यांच्या मानहानीचा राहुल गांधींविरुद्धचा खटला पुण्यातील विशेष न्यायालयात वर्ग)
वरील सर्व आरोप खोटे असून यामुळे सावरकर (Veer Savarkar) प्रेमींच्या भावना दुखावल्या. तसेच अशा वक्तव्यामुळे समाजात वितुष्ट निर्माण होण्याची भीती असते. या संदर्भात न्यायालयात बाजू मांडताना माफीवीर या आरोपासाठी जो आधार घेतला गेला होता ते सावरकरांचे पत्र त्यात ‘युवर ओबीडीएंट सर्व्हंट’ असा उल्लेख होता, अशाच आशयाचे पत्र मोहनदास करमचंद गांधी यांनीही ब्रिटिशांना लिहिले होते, म्हणून कुणी माफीवीर ठरत नाही. तो त्यावेळच्या परिस्थितीचा भाग होता, असे वकिलांनी स्पष्ट केले.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतः वीर सावरकरांना (Veer Savarkar) स्वातंत्र्यवीर संबोधल्याचे पत्रही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच भाजपाची स्थापना 1980 साली झाली होती आणि वीर सावरकरांचे निधन 1967 यावर्षी झाले होते, त्यामुळे सावरकर हे भाजपाचे जीन असल्याचा काही संबंधच येत नाही, हेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
हे सर्व लक्षात घेऊन न्यायालयाने स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांना (Veer Savarkar) देशभक्त संबोधले आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्राथमिकदृष्ट्या पुरावा दिसत असल्याने नाशिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश दीपाली कडुस्कर यांनी समन्स बजावले.
Join Our WhatsApp Community