महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज, त्यासाठी उपकरण आहे का? Raj Thackeray यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे दाखवण्याची वेळ कधी आली नाही, पण ज्या प्रकारची उपकरणे आता डोळ्यांसाठी आलेली आहेत ती पाहूनच थक्क व्हायला होतं

232
महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज, त्यासाठी उपकरण आहे का? Raj Thackeray यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

तुफान फटकेबाजी आणि रोखठोक वक्तव्य यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) प्रसिद्ध आहेत. नुकत्याच झालेल्या मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे; त्यांनी केलेल्या विधानाचा नेमका रोख कुणाकडे आहे, हे अजून कोणाच्याही लक्षात आलेलं नाही.

मुंबईत रविवारी, (२३ जून) डॉक्टर नितीन देशपांडे यांनी श्री रामकृष्ण नेत्रालय हे डोळ्यांचं रुग्णालय सुरू केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते श्री रामकृष्ण नेत्रालय या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज असून त्यासाठी काही उपकरण आहे का, असा सवाल डॉक्टरांना विचारला तसेच महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा – PUNE: पब्जवर कारवाई, पण अजूनही सर्रास ड्रग्ज विक्री? नामांकित हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल)

महाराष्ट्राची परिस्थिती पाहता…
हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे दाखवण्याची वेळ कधी आली नाही, पण ज्या प्रकारची उपकरणे आता डोळ्यांसाठी आलेली आहेत ती पाहूनच थक्क व्हायला होतं. मला आतापर्यंत फक्त A, B, C दिसतोय का ? विचारतात एवढंच माहिती होतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मी तुमची एक टूर आयोजित करू इच्छितो. जेणेकरून आताची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता अनेक लोकांचे डोळे उघडण्याची गरज आहे. त्याचे काही यंत्र तुमच्याकडे असेल, तर मला सांगा. माझे प्रयत्न सुरूच आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटलं.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी केली. ”आपण २०० जागांवर निवडणूक लढणार असून मी कोणाच्याही पुढे जागावाटपाची चर्चा करायला जाणार नाही. कुठल्याच पक्षाचा जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हेच तुम्हाला सांगायचे आहे,” असे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.