‘तू भी है राणा का वंशज, फेंक जहां तक भाला जाए’ Asian Games 2023 मध्येही नीरज चोप्राला सुवर्ण 

100

सध्या चीनमध्ये Asian Games 2023 स्पर्धा सुरु आहे,  भारताचे खेळाडू पदकांची लयलूट करू लागले आहेत. दररोज विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे खेळाडू सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई करत आहेत. बुधवार, ४ ऑक्टोबर रोजी भालाफेक स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या नीरज चोप्राने या स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळवले त्याने चौथ्या राऊंडमध्ये  88.88 मीटरचा थ्रो करत गोल्ड मेडलला गवासणी घातली.

भालाफेक स्पर्धेत भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकली

भारताच्याच किशोर जेना (Kishore Jena) याने भालाफेकमध्ये रौप्यपदक पटकावले. Asian Games 2023 मध्ये भारताने आतापर्यंत 16 गोल्ड, 28 सिल्वर आणि 32 ब्रॉन्ज मेडल असे एकूण 76 मेडल्स पटकावली आहेत. त्यात आता दोन मेडल्सची भर पडली आहे. १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अकराव्या दिवशी भारतीय भालापेकपटूंनी शानदार कामगिरी केली. भालाफेक स्पर्धेत भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकली आहेत. भालाफेकमध्ये भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८२.३८ मीटर भालाफेक केली. यानंतर भारतीय अनुभवी खेळाडूने दुसऱ्या प्रयत्नात ८४.४९ मीटरचे अंतर कापले. यापूर्वी नीरज चोप्राचा प्रयत्न तांत्रिक बिघाडामुळे अवैध ठरला होता. जेना किशोरबद्दल सांगायचे तर या खेळाडूने भारतासाठी रौप्य पदक जिंकले.

(हेही वाचा Asian Games 2023 : अविनाश साबळेने मिळवले दुसरे पदक; रचला नवा इतिहास)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.