New Delhi : जी-२० मुळे २०० रेल्वेगाड्या कराव्या लागल्या रद्द

महाराष्ट्रालाही बदलाचा फटका

106
New Delhi : जी-२० मुळे २०० रेल्वेगाड्या कराव्या लागल्या रद्द
New Delhi : जी-२० मुळे २०० रेल्वेगाड्या कराव्या लागल्या रद्द

नवी दिल्ली (New Delhi )येथे ९ आणि १० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जी २० शिखर परिषद सुरु होणार आहे. यासाठी सुमारे २०० रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणखी १०० गाड्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले तर काही गाड्यांचे सुटण्याचे स्थानक बदलण्यात आले आहे. आणि काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येत आहे. अधिकृत सूचनेनुसार २०० हून अधिक गाड्या यामुळे प्रभावित होणार असून ३०० हून अधिक गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे ७ ते १० सप्टेंबर दरम्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्याचे हाल होणार आहे, तेव्हा या कालावधीत प्रवास करणाऱ्यांनी खबरदारी घ्यायला हवी.

(हेही वाचा : Fadanvis-Bavankule : फडणवीस-बावनकुळेंच्या हातात रिपोर्टकार्ड; आमदार-खासदारांना फुटला घाम)
महाराष्ट्रालाही बदलाचा फटका

महाराष्ट्रातून धावणाऱ्या गाड्याना देखील या बदलाचा फटका बसला आहे. २२१२५नागपूर- अमृतसर एक्सप्रेस, १२९५१ मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली तेजस राजधानी, २२२०९ मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली दुरातो, २०८०५विशाखापट्टणम- नवी दिल्ली एपी एक्सप्रेस, ११०७८जम्मू तवी- पुणे झेलम एक्सप्रेस, १२९२६अमृतसर-मुंबई सेंट्रल पश्चिम एक्सप्रेस यांचा टर्मिनल बदलण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी आयोजनाआधी दिल्लीमध्ये रेल्वेने येणाऱ्या आणि दिल्लीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी प्रकाशित केली होती. ६ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२३च्या पहाटेपर्यंत बंदी राहणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.