राज्यसभेत बोलताना भाजप खासदार अजय प्रताप यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करताना म्हटले की, संपूर्ण देशात त्यांची ख्याती आहे, मात्र सिधी-सिंगरौली रस्त्याबाबत तेथील जनता निराश झाली आहे. या प्रश्नावर सभापती जगदीप धनखड यांनाही हसू आले.
काय म्हणाले नितीन गडकरी?
मध्य प्रदेशचे भाजप खासदार अजय प्रताप सिंह यांच्या प्रश्नावर हसत गडकरी म्हणाले की, हे अगदी बरोबर आहे. याचे उत्तर देताना मलाही अपराधीपणा वाटतो. मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली महामार्गांवर एक पुस्तक लिहिता येईल.
(हेही वाचा नितीन देसाईंवर होते तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; एन. डी. स्टुडिओही होता जप्तीच्या वाटेवर)
रस्त्याची संपूर्ण कहाणी सांगितली
त्यानंतर त्यांनी या रखडलेल्या रस्त्याची कहाणी सांगितली, यापूर्वी हे काम रखडले असताना कोल इंडियाकडे पैसे मागून हा रस्ता केल्याची चर्चा होती. यावर कोल इंडियाचे प्रस्ताव आले. हे दुर्दैवी आहे. याचे माझ्याकडे काहीच उत्तर नाही. पहिला पक्ष अपयशी ठरला. ते NCLT मध्ये गेले. ते संपुष्टात आल्यावर न्यायालयात गेले. न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा निवाडा होऊ शकला नाही. दुसर्या पक्षाला दिल्यावर त्याचे फारसे काही झाले नाही. आता प्रक्रिया अशी
Join Our WhatsApp Community