हल्ली जगामध्ये तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की माणसांना आपल्या हातांनी फक्त बटणं दाबायची असतात. आपली दररोजची बरीचशी कामं सोपी करण्यासाठी आपल्या घरातच कितीतरी मशीन्स उपलब्ध असतात. जसे की, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, भांडही स्वच्छ करण्यासाठी डिश वॉशर, जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन अशी कितीतरी नावं सांगता येतील. हे तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, माणसाने रोबोटही तयार केला आहे. बऱ्याच ठिकाणी कंपन्यांमध्ये माणसांऐवजी रोबोट्स काम करतात.
रोबोट्स काम करत असल्याने कंपनीच्या मालकांना त्यांना पगार द्यावा लागत नाही. याशिवाय माणसापेक्षा जास्त काम करण्याची रोबोटची क्षमता असते. यापूर्वी आपण रोबोट वेटरचे काम करत असल्याचं ऐकलं असेल. आता त्यापुढे जाऊन रोबोट सिक्युरिटीचे काम करणार आहेत अशी बातमी समोर आलेली आहे. असेच सुरू राहिले तर माणसांच्या सगळ्या नोकऱ्या हे रोबोट्स गिळंकृत करतील यात तिळमात्र शंका नाही.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये वेगाने प्रगती होत आहे. आतापर्यंत हॉटेलमध्ये रोबोट वेटरचे काम करताना किंवा रिसेप्शनवर लोकांचे स्वागत करताना आपण पाहिले आणि ऐकले असेल. पण यापुढे रोबोट्स सिक्युरिटी गार्डचे काम करतानाही तुम्हाला दिसू शकतात. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार 1X नावाच्या कंपनीने असा एक रोबोट तयार केला आहे. जो माणसांसारखा दिसतो, बोलतो, चालतो आणि वस्तूही उचलू शकतो. या रोबोटमध्ये माणसांप्रमाणेच हात, चेहरा आणि मेंदूही आहे. माणसासारखे हात असल्यामुळे हा रोबोट वस्तू उचलू शकतो. याला ‘ Humanoid EVE Robot’ असेही म्हटले जाते.
हा रोबोट आपली सिक्युरिटी गार्डची ड्युटी एप्रिल महिन्यापासून करत आहे. नॉर्वे आणि डलासयेथील इंडस्ट्रीयल साईड्सवर तयार केल्या जाणाऱ्या अँड्रॉईडवर देखरेख ठेवण्याचे काम हा रोबोट करत आहे. जर अँड्रॉईड अनियंत्रित झाला तर अशा वेळी व्हर्च्युअल रिऍलिटीद्वारे हा रोबोट ते सांभाळू शकतो. त्यासाठी हा रोबोट आपल्या कॅमेरा सिस्टीम आणि अलार्म सेन्सरचा उपयोग करतो.
Join Our WhatsApp Community