प्रामाणिक करदात्यांसाठी नवी करप्रणाली जाहीर

187

प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले असून, वेळेत कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी नवी करप्रणाली जाहीर करण्यात आली आहे. पारदर्शक करप्रणालीसाठी एक नवे व्यासपीठ तयार करण्यात आलेलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ (Transparent Taxation : Honouring the Honest) असं या व्यासपीठाचं नाव आहे.

या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणाऱ्यांच्या मनातील भीती दूर होईल असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. तसेच देशवासियांना कर भरण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. ही नवी करप्रणाली आजपासून लागू होणार असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.

काय म्हणाले मोदी

देशातील प्रामाणिक करदाता देशाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावतो. प्रामाणिक करदात्यासोबत देशाचाही विकास होत असतो. आज प्रत्येकाला शॉर्टकट योग्य नसल्याचे लक्षात येत आहे. चुकीचे मार्ग निवडणं योग्य नाही. ती वेळ, काळ निघून गेला आहे. देशभरात नवे बदल होत आहेत. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणाऱ्यांच्या मनातील भीती दूर होईल,” असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. एक काळ होता जेव्हा बदल करण्यासंबंधी खूप चर्चा व्हायची. काही वेळा दबावात किंवा इच्छा नसतानाही निर्णय घेत बदल करण्यात आल्याचे सांगितले जायचे. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही धोरणात्मक बदलाला महत्त्व दिले आहे. प्रत्येकाचा दुसऱ्याशी संबंधही असला पाहिजे याकडे लक्ष देत आहोत,” असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.