मुलाने ६५व्या वाढदिवसाचे गिफ्ट दिलेला मोबाईल हरवल्यामुळे निराश झालेल्या आईच्या चेहऱ्यावर पोलिसांमुळे (Police) हसू फुलले आहे. मुलुंड पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले १० मोबाईल फोन हस्तगत करून तक्रारदाराला परत केले, त्यात ६५ वर्षीय महिलेचा मोबाईल फोनचा समावेश होता. मुलाने वाढदिवसाच्या दिवशी दिलेला मोबाईल फोन पुन्हा मिळाल्यामुळे आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
मुलुंड पश्चिम येथे राहणाऱ्या जेष्ठ नागरिक शंकूतला रमेश जाधव यांची ६५वी जानेवारी २०२५ मध्ये झाली, मुलाने आईच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त नवाकोरा सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन भेट दिला होता. मुलाने दिलेला मोबाईल फोन मिळाल्यामुळे शकुंतला आनंदी होत्या, मात्र त्यांचा हा आनंद जास्त ठिकला नाही. दुसऱ्या आठवड्यातच प्रवासा दरम्यान त्यांचा मोबाईल फोन हरवला, मुलाने भेट दिलेला मोबाईल फोन त्यांच्याकडून हरवल्यामुळे त्यांना खुप निराश झाल्या होत्या.
(हेही वाचा Prashant Koratkar ला तेलंगणात अटक; छत्रपती शिवरायांबद्दल अवमानजनक वक्तव्यामुळे महिन्याभर होता फरार)
मोबाईल हरवल्याची तक्रार मुलुंड पोलीस (Police) ठाण्यात दाखल करण्यात आली होती, शंकूतला दररोज मोबाईल मिळाला का विचारायला पोलीस ठाण्यात जात होत्या व मोबाईल मिळाला का विचारून पुन्हा जड अंतकरणाने घरी परतत होत्या. पोलिसांनी हे प्रकरण थोडं गंभीरपणे घेऊन मुलुंड पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले आणि चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेऊन मार्च महिन्यात १० तक्रारदार यांचे मोबाईल फोन शोधून काढले, त्यात शकुंतला यांचा मोबाईल फोन मिळून आला होता. पोलीस उपायुक्त परिमंडळ, ७ विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त, मुलुंड विभाग संदीप मोरे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुलुंड पोलीस ठाणे अजय जोशी, पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे यांची उपस्थितीत शनिवारी हे सर्व मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यात आले.
शकुंतला जाधव यांना देखील त्यांचा मोबाईल फोन परत करण्यात आला त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता, मुलाने वाढदिवशी दिलेले गिफ़्ट परत मिळेल याची त्यांना शास्वती नव्हती, मात्र मोबाईल हातात बघून त्याच्या डोक्यात आनंदाश्रू होते, यावेळी त्यांनी पोलिसांचे (Police) आभार मानले. तांत्रिक पद्धतीने मोबाईल फोन शोधण्याची कामगिरी मुलुंड सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक अमोल बोरसे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद आपुणे व पथक यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community