‘कंगनाचे तोंड फुटणार’ भाजपाचाही यु टर्न

95

मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर असल्याची टीका बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने केल्यानंतर आता कंगनावर चहुबाजूने टीका होत असताना आता कंगनाला शिवसेनेकडून धमकी वजा इशार देण्यात आला असून, शिवसेनेच्या रणरागिनी कंगनाचे तोंड फोडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

काय म्हणाले सरनाईक

कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दात समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही. उद्योजक आणि सेलिब्रेटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी केल्याचे सरनाईक म्हणालेत.

कंगनाला मुंबई-महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाह असे देखील देशमुख म्हणालेत.

भाजपाचा ‘यु-टर्न’

अभिनेत्री कंगना राणौतबाबत भाजपा आमदार राम कदम यांच्या वक्तव्यापासून भाजपने हात झटकलेत. कंगनाचे समर्थन करणाऱ्या भाजपने यू टर्न घेतला आहे. पत्रकार परिषद घेऊन आमदार आशिष शेलार यांना सारवासारव करावी लागली. राम कदम यांनी झाशीच्या राणीशी कंगना राणौतची तुलना केली होती. मात्र अखेर भाजपला या प्रकरणातून हात झटकावे लागले. कंगना राणौत हिने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असे शेलार म्हणालेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.