सांगलीमध्ये उबाठा गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) (Pratik Patil) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मविआतील धुसफुस अजुनही सुरूच आहे. अशातच, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार भूमिकेत असलेल्या काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासाठी आता बंधू प्रतिक पाटील (Pratik Patil) यांनी आज (१० एप्रिल) सकाळीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. प्रतिक पाटील यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) भेट घेतली. (Pratik Patil)
(हेही वाचा – MNS : राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसेला कोणी केला अखेरचा जय महाराष्ट्र ?)
प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटलांनी उमेदवारी दाखल करावी, असा सल्ला दिला आहे. यानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. सांगलीमध्ये विशाल पाटील समर्थकांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत प्रकाश आंबेडकरांशी झालेल्या चर्चेचा तपशील विशाल पाटील कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत. (Pratik Patil)
(हेही वाचा – Arvind Kejriwal: गेल्या २४ तासांत केजरीवालांना दुसरा मोठा दणका; आता ‘ही’ याचिका फेटाळली)
प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे. “काँग्रेसने आधीच ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रात त्यांना आपला अस्तित्व ठेवायचे की नाही? सांगलीमध्ये शिवसेनेत ताकद कुठे दिसत नाहीय. आज सकाळी पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठलाही आग्रह केलेला नाही किंवा कुठलीही सजेशन दिलं नाही.” असं आंबेडकर म्हणाले आहेत. (Pratik Patil)
हे पहा –
Join Our WhatsApp Community