दक्षिण कोकणात पावसाचा धूमाकूळ सुरु असताना मुंबईत गुरुवारी पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून आले. मात्र आदल्या दिवशी पावसाच्या धुमाकुळीमुळे वातावरणात गारवा कायम राहिला. शुक्रवारीही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा कायम असून मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
गुरुवारच्या पावसाने २४ तासांत केवळ सांताक्रूझमध्ये १०० मिमी पावसाची नोंद केली. मात्र शुक्रवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत सांताक्रूझला केवळ २० मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे केवळ १६ मिमी पाऊस झाला. मात्र कमाल आणि किमान तापमानात झालेली घट कायम दिसून आली. किमान तापमानात २४.८ अंश सेल्सियस होते. गुरुवारी कमाल तापमान २७.४ तर शुक्रवारी कमाल तापमान २७.९ अंश सेल्सियस वर नोंदवले गेले. रविवारनंतर मुंबईत पावसाचा जोर अजून कमी होईल असाही अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.
(हेही वाचा IMD Alert : राज्यात ‘या’ ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा)
Join Our WhatsApp Community