वय नसताना सरकार वाकलंय, याला त्याला घेऊ नका; Raj Thackeray यांचा चंद्रकांत पाटलांना सल्ला

239

ज्येष्ठ चित्रकार शि.द . फडणीस यांच्या शंभरी निमित्ताने पुण्यात सोमवार, 29 जुलै रोजी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शि. द. फडणीस यांचा सत्कार केला. राज ठाकरे यांनी शि.द. फडणीस यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बोलत असताना थेट मंचावरुन चंद्रकांत पाटलांच्या समक्ष राज ठाकरेंनी सरकारवर टिप्पणी केली. ताट पद्धतीने सरकार चालवा असा थेट सल्लाच राज ठाकरेंनी भर कार्यक्रमात पाटलांना दिला.

(हेही वाचा Muslim : कुर्ल्यात वासनांध मुसलमान आरोपीने दिव्यांग तरुणीवर केले लैंगिक अत्याचार)

काय म्हणाले राज ठाकरे?

शि.द. फडणीस यांच्या कार्यक्रमात बोलत असताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुती सरकारवर थेट निशाणा ठेवला. राज ठाकरे म्हणाले, इतके वय नसताना सरकार वाकलेले आहे. या झाडाची फळे पाहिजे त्या झाडाची फळे पाहिजे असे करु नका असा थेट सल्लाच राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना मंचावरुन दिला. राज ठाकरेंच्या सल्ल्यामुळे उपस्थित सारेही खळखळून हसू लागले. पुढे शि.द. फडणीस यांच्याबद्दल बोलत असताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा गंभीर टीका केली. राज ठाकरे म्हणाले, शि. द. फडणीस सरांचे आडनाव फडणीस त्यांना ‘व’ ने वाचवले ‘फडणीस’ म्हणून व्यगं चित्रकार झाले, ‘फडणवीस’ असते तर व्यंग चित्र झाले असते अशी थेट बोचरी टीका राज ठाकरेंनी केली. तर पुढे राज ठाकरे म्हणाले, आर्टस स्कूल मध्ये असणाऱ्या डीनला साधे फूल सुद्धा काढता येत नाही, चंद्रकांत पाटील म्हणाले अकादमी काढतो, पण तिथे शिकवणार कोण असा थेट सवाल राज ठाकरेंनी केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.