Raj Thackeray : खोके खोके ओरडतायेत  त्यांच्याचकडे आहेत कंटेनर ,राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला

पनवेलमध्ये मनसेचा मेळावा आयोजन

135
Raj Thackeray : खोके खोके ओरडतायेत  त्यांच्याचकडे आहेत कंटेनर ,राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Raj Thackeray : खोके खोके ओरडतायेत  त्यांच्याचकडे आहेत कंटेनर ,राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला

जे खोके खोके ओरडत त्यांच्याकडे तर  कंटेनर आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी Raj Thackeray उद्धव ठाकरेंवर चांगलाच टोला लगावला. हे खोके घेत असताना त्यांनी कोविड पण सोडला नाही. हेच तुमच्याकडे येणार निवडणुकीच्या तोंडावर आणि कुणालातरी दाखवणार. प्रत्येक वेळी यायचं बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला इमोशनल करायचं.हेच सुरु आहे असे राज ठाकरे Raj Thackeray बाेलले. पनवेलमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात होता. त्यात बोलत असताना राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले कि, जे पुण्यात मी अनेकदा सभा घेऊन सांगतिलं आहे. मुंबई बरबाद व्हायला एक मोठा काळ गेला आहे. मात्र पुणे बरबाद व्हायचं असेल तर फार वेळ लागणार नाही. मी मागच्या २५ वर्षांपासून हे सांगतो आहे असंही राज ठाकरे म्हणाले. कारण कुठलीही आखणी केलेली नाही. आमच्याकडे टाऊन प्लानिंग नावाची गोष्टच नाही फक्त डेव्हलपमेंट प्लान येतो. पुण्याचा अंदाज घ्या, तुम्हाला लक्षात येईल तिथे गुदमरलेला मराठी माणूस आहे. कोकणातही कुणीही येतंय जमिनी घेतं आहे.

( हेही वाचा – Vishwakarma Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली विश्वकर्मा योजना काय आहे? कुणासाठी आहे?)

‘मुंबई-गोवा महामार्गावर आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च’

मुंबई-गोवा या रस्त्यावर आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रस्ता नाही झाला बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. मी (Raj Thackeray) गडकरी यांच्याशी बोललो तर ते म्हणाले कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेले. यामागे काही कारण तर नाही ना? कुणाचं काम तर नाही ना? कोकणातील जमिनी इतरांच्या घश्यात चालल्या आहेत. नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू प्रकल्प आला. तिकडे साधे  फेंनसिंग  ही बांधण्यात  आलेले नाहीत. रस्ता बांधून ४५० दिवस झालेत. त्यात ३५० माणसे गेली. फेंनसिंग   नाही बांधली मात्र टोल बांधतात त्यामुळे पैसे भरा आणि मरा असेही ठाकरे म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.