मुंबई पोलीस दलात पुढील काही दिवसात मोठे फेर बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची पोलीस महासंचालकपदी बदली होण्याची शक्यता असून पोलीस आयुक्त पदी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे. दरम्यान, रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच कथित फोन टॅपिंग प्रकरणामुळे वादात भोवऱ्यात अडकलेल्या जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची रजनीश सेठ यांच्या जागी पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात येणार होती. मात्र रश्मी शुक्ला यांची राज्याचे पोलीस प्रमुखपदी निवड तात्पुरती थांबविण्यात आली होती. (Mumbai Police)
जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना राज्याच्या महासंचालक पदामध्ये रस नसून त्या मुंबईचे पोलीस आयुक्त पदासाठी इच्छूक असल्यामुळे पोलीस महासंचालकपदाची निवड तात्पुरती थांबविण्यात आली होती. रजनीश सेठ यांनी देखील अद्याप पोलीस महासंचालकपदाचा पदभार सोडलेला नाही. मात्र लवकरच मुंबई पोलीस दलात फेरबदल होण्याची शक्यता असून मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची पोलीस महासंचालक पदी निवड करण्यात येणार असून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून रश्मी शुक्ला यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. (Mumbai Police)
तसेच मुंबई पोलीस दलाचे सहपोलिस आयुक्त (का.व.सु) सत्यनारायण चौधरी यांची बदली होण्याची शक्यता असून त्यांच्या जागी जेष्ठ आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांना आणण्याची शक्यता आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त लखमी गौतम यांना देखील गुन्हे शाखेच्या पदावरून काढून त्यांना राज्य पोलीस दलात बदली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई पोलीस दलात होणाऱ्या या फेरबदलाची चर्चा आयपीएस अधिकारी यांच्यात सुरू असून मुंबई बाहेर असलेल्या आयपीएस अधिकारी यांना मुंबईत आणण्याची शक्यता आहे. (Mumbai Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community