जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) सोमवारी अंजनगाव सुर्जी येथे दहीहंडीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करत होते. यावेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राणा यांचे माध्यम समन्वय अजय बोबडे शुभम उंबरकर यांनी या घटनेला दुजोरा आहे. काही शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ठाकरे गटाच्या सुनील खराडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी काल अमरावती येथे सर्वात मोठी दहीहंडी आयोजित केली त्यानंतर दुपारच्या सुमारास ते दर्यापूर येथील कावड यात्रे सहभागी झाले होते. आज सायंकाळी अंजनगाव सुर्जी तालुक्यात त्यांनी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित या दहीहंडी स्पर्धेत आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, अभिनेत्री अमिषा पटेल, चंकी पांडे यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. अंजनगाव सुर्जी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जागेची पाहणी करत असताना त्या ठिकाणी काही आठ ते दहा हल्लेखोरांनी आमदार राणा यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती राणांचे माध्यम समन्वयक अजय बोबडे यांनी जाहीर केली. अजय बोबडे यांनी हल्लेखोर हे ठाकरे गटाचे शिवसैनिक असल्याचा दावा केला आहे. रवी राणा (Ravi Rana) यात थोडक्यात बचावले असून त्यांना सध्या कुठलीही इजा झालेली नाही.
Join Our WhatsApp Community