-
ऋजुता लुकतुके
रविचंद्रन अश्विनला निरोपाची कसोटीही मिळाली नाही, असा जो वाद सुरू झाला होता त्याला आता खुद्ध अश्विनने उत्तर दिलं आहे. त्यालाच निरोपाची कसोटी नको होती, असं तो यावर म्हणतोय. निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे आणि आपली वेळ संपली आहे असं वाटूनच निवृत्ती स्वीकारल्याचं अश्विनने आपल्या युट्यूब वाहिनीवर बोलताना स्पष्ट केलं. (Ravichandran Ashwin Retirement)
बोर्डर – गावसकर मालिका सुरू असताना तिसऱ्या कसोटीनंतर अचानक रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिल्यावर रोहीतसह अश्विन पत्रकार परिषदेसाठी आला तेव्हाही सगळ्यांसाठी तो आश्चर्याचा धक्का होता. आणि अनेकांनी अश्विनला सन्माने निवृत्त होता आलं नाही असं मत व्यक्त केलं होतं. म्हणजेच शेवटच्या कसोटीत लोकांसमोर निवृत्त होण्याची संधी त्याला मिळावी, असं अनेकांचं मत पडलं. (Ravichandran Ashwin Retirement)
‘एरवी मी आयुष्यात खूप विचार करतो. पण, काही गोष्टी अचानक होतात. जेव्हा तुम्ही तुमचं काम केलंय अशी भावना निर्माण होते आणि आता करायला काही नसतं, तेव्हा विचार करण्याची गरज नसते. माझ्यातील सर्जनशीलता मला खेळायला उद्युक्त करत असते. तीच संपली असेल तर खेळत कशासाठी राहायचं. फक्त मला निरोप देण्यासाठी संघात मला खेळवतायत, असं कुणालाच आवडणार नाही. मी पहिली कसोटी खेळलो नाही, दुसरी खेळलो, तिसरी खेळलो नाही, चौथी आणि पाचवी किंवा यातील एखादी खेळू शकलो असतो, अशा विचारांना तिथे जागा नसते,’ असं अश्विन चॅनलवर बोलताना म्हणाला.
Ashwin anna take on farewell test. pic.twitter.com/v5JX7Yv18M
— Spiderman Pant (@cricwithpant) January 14, 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारतानाच अश्विनने आणखी क्रिकेट खेळण्याची उर्मीही बोलून दाखवली आहे. क्रिकेट अजून संपलेलं नाही, असं त्याला वाटतं. ‘मला क्रिकेट खेळायचं आहे. पण, मला भारतीय ड्रेसिंग रुममध्ये जागा नाही. मग काय करायचं? माझी जागा मला शोधून काढावी लागेल. मला माझ्याशी आणि खेळाशी प्रामाणिक राहून ही जागा शोधावी लागेल. मी अंतिम अकरामध्ये बसत नाही. पण, निरोपाची कसोटी आहे म्हणून मला खेळवलं, असं काहीतरी नको,’ असं अश्विनने स्पष्ट केलं आहे. (Ravichandran Ashwin Retirement)
(हेही वाचा- उमरग्याचे MLA Pravin Swami यांच्या आमदारकीवर संकट ? काय आहे नेमकं कारण ?)
अर्थातच, अश्विन चेन्नई सुपरकिंग्जकडून आयपीएलचा पुढील हंगाम खेळणार आहे. आणि त्यासाठी त्याने संघाबरोबर सरावही सुरू केला आहे. (Ravichandran Ashwin Retirement)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community