Sajjad Nomani यांचा नवा जिहादी संदेश; म्हणाले, महाराष्ट्रात भाजपा हरला, तरच दिल्ली सरकार लवकर कोसळेल; आमचे लक्ष्य दिल्ली

याआधी  सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांनी त्यांच्या अधिकृत यु ट्यूब चॅनलवर व्हिडीओ टाकून 'राज्यातील विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद करण्याचे आवाहन केले होते. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये सज्जाद नोमानी यांनी त्यांच्या वोट जिहाद मागील संकल्पना स्पष्ट केली.

64

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अतिशय महत्वाची आहे. या ठिकाणी जर भाजपा हरला, तर दिल्ली सरकार कमजोर होईल आणि लवकरच कोसळून जाईल, त्यामुळे आमचे केवळ महाराष्ट्र लक्ष्य नाही तर दिल्ली आहे, असे आवाहन करत ऑल इंडिया पर्सनल मुस्लिम लॉ बोर्डाचे प्रवक्ते खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांनी जर हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात भाजपा जिंकली, तर त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढेल, असेही म्हटले.

भाजपा विरोधी पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा 

भाजपा आणि संघाच्या विरोधात जे उमेदवार आहेत, त्यांची आम्ही यादी बनवली. यात २३ मुसलमान उमेदवारही आहेत. अनेक उमेदवार आमच्याकडे आले, त्यांच्याकडून आम्ही काही आश्वासने घेतली आहेत, त्यानंतर आम्ही ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे, त्या उमेदवारांची यादी बनवली आहे, असेही सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) म्हणाले.

(हेही वाचा Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट; नव्या राजकीय वादळाचे संकेत?)

नोमानी यांनी वोट जिहाद मागील भूमिका केली स्पष्ट 

याआधी  सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांनी त्यांच्या अधिकृत यु ट्यूब चॅनलवर व्हिडीओ टाकून ‘राज्यातील विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद करण्याचे आवाहन केले होते. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये सज्जाद नोमानी यांनी त्यांच्या वोट जिहाद मागील संकल्पना स्पष्ट करताना निवडणुकीत केवळ भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला हरवण्यासाठी मुसलमानांनी मतदान करावे, कारण जर महाराष्ट्रात भाजपा हरली तर दिल्लीतील भाजपा सरकार फार काळ टिकत नाही, असा विश्वास सज्जाद नोमानी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत मविआच्या सर्व घटक पक्षांना मुसलमानांची एक गठ्ठा मते मिळाली म्हणून मविआचे खासदार बऱ्यापैकी निवडून आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही आता मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हे तिन्ही पक्ष मुसलमानांचे तळवे चाटू लागले आहेत. आता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांनी भाजपा विरोधी मविआच्या सर्व घटक पक्षांना पुन्हा जाहीर पाठिंबा दिला आहे.

… म्हणून फडणवीसांनी केले धर्मयुद्धाचे आवाहन 

सज्जाद नोमानी यांनी पत्रकार परिषदेत वोट जिहाद करण्याचे आवाहन मुसलमानांना केल्यानंतर भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता प्रचारसभांमध्ये  सज्जाद नोमानी यांनी वोट जिहाद करण्याचे आवाहन केलेला व्हिडीओ उपस्थितीतांना ऐकवून दाखवत आहेत आणि मुसलमानांच्या या आक्रमणाच्या विरोधात हिंदूंनाही धर्मयुद्ध करण्यासाठी तयार व्हावे लागले, असे आवाहन करत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.